Home / arthmitra / Gold Limit: तुम्ही घरात किती तोळे सोने ठेवू शकता? जाणून घ्या महत्त्वाचा नियम

Gold Limit: तुम्ही घरात किती तोळे सोने ठेवू शकता? जाणून घ्या महत्त्वाचा नियम

Gold Limit: सध्या सोन्याच्या किमती रोज नवे विक्रम करत असल्या, तरी धनत्रयोदशी आणि दिवाळी २०२५ च्या तोंडावर पिवळ्या धातूची मागणी...

By: Team Navakal
Gold Limit

Gold Limit: सध्या सोन्याच्या किमती रोज नवे विक्रम करत असल्या, तरी धनत्रयोदशी आणि दिवाळी २०२५ च्या तोंडावर पिवळ्या धातूची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सणासुदीच्या काळात सोने, चांदी किंवा इतर मौल्यवान वस्तू घरात ठेवणे हा प्रत्येक कुटुंबाचा वैयक्तिक निर्णय असतो.

मात्र, त्यावर कोणताही कर लागू होऊ नये म्हणून सोने घरी ठेवण्याची मर्यादा काय आहे, याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

Gold Limit: घरी ठेवता येणाऱ्या सोन्याची मर्यादा:

रिपोर्टनुसार, आयकर कायद्यात (Income Tax Act) कोणतीही व्यक्ती घरात किती सोने (दागिने, नाणी किंवा वस्तूरूपात) कायदेशीररित्या ठेवू शकते, यावर कोणतीही निश्चित कमाल मर्यादा नाही.

तरीही, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) आयकर विभागाच्या शोध आणि जप्ती कारवाईच्या वेळी काही प्रशासकीय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, खालील प्रमाणात ठेवलेले सोने सहसा जप्त केले जात नाही:

  • विवाहित महिला: प्रति विवाहित महिला ५०० ग्रॅम (Gram)
  • अविवाहित महिला: प्रति अविवाहित महिला २५० ग्रॅम
  • पुरुष सदस्य: प्रति पुरुष सदस्य १०० ग्रॅम

ही आकडेवारी केवळ कारवाई टाळण्यासाठीचा आधार आहे, ही कोणतीही कायदेशीर मर्यादा नाही.

Gold Limit: मर्यादेपेक्षा जास्त सोनं असल्यास काय करायचं?

जर एखाद्या व्यक्तीकडे या मर्यादेपेक्षा जास्त सोनं असेल, तरी ते तत्काळ ‘अघोषित संपत्ती’ मानले जात नाही. करदाता खरेदीची बिले , वारसा हक्काचे कागदपत्रे किंवा भेटवस्तूची नोंद यांसारखे ठोस पुरावे सादर करून अतिरिक्त सोन्याचे स्पष्टीकरण देऊन ते वैध ठरवू शकतो.

घरी किती सोनं ठेवावं यावर कोणतीही निश्चित मर्यादा नसली तरी, ते सोने कायदेशीर आणि ट्रेस करता येईल अशा स्त्रोतांकडूनच खरेदी केलेले असावे.

आयकर रिटर्नमध्ये सोन्याची माहिती आवश्यक?

तसेच, ज्या करदात्यांचे उत्पन्न कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना आर्थिक वर्ष २०२५-२६ पासून आयकर रिटर्नमधील (ITR) शेड्यूल एएल (AL – मालमत्ता आणि दायित्वे) मध्ये त्यांच्या सर्व मालमत्तांची आणि दायित्वांची माहिती देणे अनिवार्य आहे.

हे देखील वाचा – Scholarship Exam: शिष्यवृत्ती परीक्षा आता चौथी आणि सातवीसाठी; जाणून घ्या नवे नियम

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या