Ahmedabad Judge Attack – काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई (Justice of India B.R Gavai )यांच्यावर बूट फेकल्याची घटना घडली होती.त्या घटनेनंतर आता गुजरातमध्येही अशाच प्रकारची धक्कादायक घटना घडली आहे. अहमदाबादच्या भद्रा दिवाणी आणि सत्र न्यायालयात न्यायाधीशांनी निर्णय दिल्यानंतर एका फिर्यादीने त्यांच्यावर बूट फेकून संताप व्यक्त केला. या घटनेमुळे न्यायालय परिसरात काही काळ गोंधळ उडाला.
१९९७ साली झालेल्या एका मारहाणीच्या (1997 Assault case.)प्रकरणातील फिर्यादीने अतिरिक्त प्रधान न्यायाधीश एम. पी. पुरोहित (Judge M. P. Purohit)यांच्या दिशेने आपले दोन्ही बूट फेकले. या प्रकरणात चार आरोपींवर हल्ल्याचा आरोप होता. मात्र, न्यायालयाने त्यांना निर्दोष घोषित केले. हा निर्णय ऐकताच फिर्यादी आक्रमक झाला. सरकारी वकिलांनी सांगितले की, न्यायाधीशांनी निर्णय दिल्यानंतर त्याने न्यायाधीशांना शिवीगाळ करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
पोलीस आणि वकिलांनी (lawyers)शांत करण्याचा प्रयत्न केल्यावर तो आणखी संतापला. त्याने एकामागोमाग आपले दोन्ही बूट (shoes) न्यायाधीशांच्या दिशेने फेकले. सुदैवाने या घटनेत न्यायाधीशांना कोणतीही दुखापत झाली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, न्यायाधीश पुरोहित यांनी त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवण्यास नकार दिला. करंज पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. परंतु न्यायाधीशांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई करू नका, अशी विनंती केली.
हे देखील वाचा –
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’चे निर्माते मांजरेकरांविरुद्ध दावा
जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात हायकोर्टात याचिका
भारतात होणाऱ्या T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये कोणते 20 संघ खेळणार? वाचा संपूर्ण यादी