Home / महाराष्ट्र / Bar owner police harassment : बार मालकांचा पोलिसांकडून छळ आहार संघटनेचा हायकोर्टात दावा

Bar owner police harassment : बार मालकांचा पोलिसांकडून छळ आहार संघटनेचा हायकोर्टात दावा

Bar owner police harassment : अधिकृत परवाने असूनदेखील पोलीस अधिकारी पदाचा दुरुपयोग करून ऑर्केस्ट्रा बार मालकांचा विनाकारण छळ करतात,असा आरोप...

By: Team Navakal
Mumbai High Court

Bar owner police harassment : अधिकृत परवाने असूनदेखील पोलीस अधिकारी पदाचा दुरुपयोग करून ऑर्केस्ट्रा बार मालकांचा विनाकारण छळ करतात,असा आरोप मुंबईतील हॉटेल(Mumbai Hotel), बार (Bar) आणि रेस्टॉरंट (Restaurant) मालकांची संघटना आहारने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) एका याचिकेद्वारे केला. अंधेरी आणि विले पार्ले पोलीस ठाण्यांमधील पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात ‘आहार’ने ही याचिका दाखल केली आहे.

पोलीस अधिकारी ऑर्केस्ट्रा चालवण्याचा अधिकृत परवाना असलेल्या बारमध्ये कोणत्याही आदेशाविना धाडी मारतात आणि तिथे आपली कला सादर करणाऱ्या महिला कलावंतांना अपमानित करतात, त्यांच्यासोबत मोबाईलवर सेल्फी काढतात आणि कायदेशीरपणे चालणाऱ्या व्यवसायात खोडा घालतात, असा आरोप ‘आहार’ने आपल्या याचिकेमध्ये केला आहे. याचिकेत विले पार्ले पूर्व येथील मयुरी हॉटेलमध्ये २३ मे रोजी घडलेल्या घटनेचा उल्लेख आहे. या हॉटेलमध्ये तपासणी करण्याच्या नावाखाली धाड मारणाऱ्या पोलिसांनी मोफत मद्य देण्याची मागणी केली. तसेच महिला कलावंतांसोबत बळजबरीने सेल्फी काढले आणि महिला कलावंतांशी गैर वर्तणूक केली, असा आरोप ‘आहार’ने केला आहे.

अंधेरी पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षकांनी ११ एप्रिल रोजी जारी केलेल्या परिपत्रकालादेखील ‘आहार’ने याचिकेमध्ये आव्हान दिले आहे. या परिपत्रकाद्वारे विविध बार आणि रेस्टॉरंटच्या बाहेर रात्री १ ते ४ या वेळेत पोलीस काँन्स्टेबल तैनात करणे अंधेरीच्या वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बंधनकारक करण्यात आले आहे. हे परिपत्रक आक्षेपार्ह आणि बेकायदेशीर आहे,असा दावा ‘आहार’ने केला आहे.


हे देखील वाचा – 

दिल्लीनंतर गुजरातमध्येभर न्यायालयात बूट हल्ला

उत्तर प्रदेशात धर्मांतर केल्याचे आरोप खोटे कोर्टाचा संताप !एकही सबळ पुरावा नाही

अमेरिकेत पन्नास प्रकारच्या कर्करोगांची एकत्रित चाचणी

Web Title:
संबंधित बातम्या