Home / महाराष्ट्र / COVID-19 : कोरोना काळात चुकीचे उपचार; सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल

COVID-19 : कोरोना काळात चुकीचे उपचार; सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल

COVID-19 : अहिल्यानगरमध्ये कोरोनाच्या काळात ७९ वर्षीय बबनराव खोकराळे यांचा खोटा कोविड (COVID) रिपोर्ट बनवून चुकीचे उपचार करण्यात आले. तसेच...

By: Team Navakal
COVID-19

COVID-19 : अहिल्यानगरमध्ये कोरोनाच्या काळात ७९ वर्षीय बबनराव खोकराळे यांचा खोटा कोविड (COVID) रिपोर्ट बनवून चुकीचे उपचार करण्यात आले. तसेच त्यांचा मृतदेह अद्यापपर्यंत कुटुंबियांना मिळालेला नाही. या प्रकरणी मुलगा अशोक खोकराळे यांच्या फिर्यादीवरून सहा डॉक्टरवर (doctor) गुन्हा दाखल करण्यात आला.

बबनराव खोकराळे यांना १३ ऑगस्ट २०२० रोजी घशात खवखव झाल्याने डॉ. सचिन पांडुळे यांच्या पटियाला हाऊस येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्या वेळी सर्व रिपोर्ट नॉर्मल असतानाही त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. त्यानंतर कुटुंबीयांना भेटण्यास मज्जाव करण्यात आला होता.

मुलगा अशोक खोकराळे हे १८ ऑगस्ट रोजी वडिलांचा मृतदेह घेण्यासाठी गेले असता मृतदेह घेण्यासाठी जिल्हा रुग्णालय आणि महानगरपालिकेशी संपर्क साधा असे सांगण्यात आले. परंतु बबनराव यांचा मृतदेह मिळालाच नाही. याबाबत अशोक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्याचा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशीत उघड झाले की, रुग्णाचा खोटा आरटीपीसीआर रिपोर्ट तयार करून आर्थिक फायदा मिळविण्यासाठी जाणीवपूर्वक चुकीचे उपचार दिले. रुग्णाला बेडला बांधून ठेवले, धमकावले, जेवण दिले नाही आणि एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार दाखवून बिले उकळली. याशिवाय पुरावा नष्ट करण्यासाठी व अवयव तस्करीच्या हेतूने मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचाही आरोप करण्यात आला आहे.


हे देखील वाचा – 

दिल्लीनंतर गुजरातमध्येभर न्यायालयात बूट हल्ला

उत्तर प्रदेशात धर्मांतर केल्याचे आरोप खोटे कोर्टाचा संताप !एकही सबळ पुरावा नाही

अमेरिकेत पन्नास प्रकारच्या कर्करोगांची एकत्रित चाचणी

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या