Women’s World Cup 2025: आयसीसी महिला विश्वचषक 2025 (ICC Women’s World Cup 2025) मध्ये रविवारी इंग्लंडकडून झालेल्या पराभवामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपांत्य फेरीत (Semifinals) पोहोचण्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्धचे पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारताला दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून सलग तीन पराभव स्वीकारावे लागले आहेत.
सध्या 5 सामन्यांमध्ये 3 पराभवांसह, भारत सध्या 4 गुणांसह गुणतालिकेमध्ये चौथ्या स्थानावर (Fourth Position) आहे.
Women’s World Cup 2025: तीन संघ पात्र, चौथा संघ कोण?
इंग्लंडने 5 पैकी 4 सामने जिंकून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. इंग्लंडसोबतच दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनीही नॉकआउट्ससाठीआपले स्थान पक्के केले आहे. यामुळे चौथ्या उपांत्य फेरीच्या जागेसाठीची लढत रोमांचक बनली आहे आणि भारताचा पराभव त्यांना नाजूक परिस्थितीत घेऊन गेला आहे.
भारतासाठी उपांत्य फेरीची संधी आणि समीकरणे:
इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला असला तरी, भारताकडे उपांत्य फेरीसाठी पात्र होण्याची अजूनही संधी आहे. 23 ऑक्टोबरला नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना हा महत्त्वाचा आहे. याव्यतिरिक्त, कोणत्याही गणिताच्या किचकटपणामध्ये न अडकता थेट पात्र होण्यासाठी 26 ऑक्टोबरला होणारा बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकणेही आवश्यक आहे.
भारतासाठी उपांत्य फेरीच्या पात्रतेची संभाव्य समीकरणे
जर भारत न्यूझीलंडकडून हरला आणि बांगलादेशला हरवले, तर हरमनप्रीत कौरच्या संघाला न्यूझीलंडने त्यांचा शेवटचा साखळी सामना इंग्लंडविरुद्ध गमावावा अशी आशा करावी लागेल. त्यानंतर उपांत्य फेरीची पात्रता भारत आणि न्यूझीलंड यांच्या NRR वर अवलंबून असेल.
भारत दोन्ही सामने जिंकल्यास: 5 सामन्यांतून फक्त 4 गुण असल्याने, उपांत्य फेरीमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी भारताला उर्वरित दोन्ही सामने (न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध) जिंकणे आवश्यक आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना रद्द झाल्यास: जर न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांचे गुण 5 होतील. अशा परिस्थितीत, न्यूझीलंडच्या तुलनेत भारताचा नेट रन रेट (Net Run Rate – NRR) चांगला असल्यामुळे भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.
भारत 1 सामना जिंकल्यास व 1 हरल्यास: जर भारताने न्यूझीलंडला हरवले आणि बांगलादेशविरुद्ध हार पत्करली, तरीही त्यांची पात्रतेची स्थिती मजबूत राहील. कारण न्यूझीलंडने इंग्लंडला हरवले तरीही न्यूझीलंडच्या तुलनेत भारताचा नेट रन रेट (NRR) चांगला असेल.
हे देखील वाचा – Donald Trump Tariffs: ‘रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यास…’; डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला पुन्हा थेट इशारा