Home / महाराष्ट्र / Potholes Roads Infrastructure : राज्यभरात खड्ड्यांचं सावट..

Potholes Roads Infrastructure : राज्यभरात खड्ड्यांचं सावट..

Potholes Roads Infrastructure : पूर्वीच्या काळापासूनच दळणवळणाला विशेष महत्व आहे. शिवाय सार्वजनिक दळणवळण(Public transport) व्यवस्था ही देशाच्या अर्थकारणांचा (Economic) महत्वाचा...

By: Team Navakal
Potholes Roads Infrastructure

Potholes Roads Infrastructure : पूर्वीच्या काळापासूनच दळणवळणाला विशेष महत्व आहे. शिवाय सार्वजनिक दळणवळण(Public transport) व्यवस्था ही देशाच्या अर्थकारणांचा (Economic) महत्वाचा गाभा मानला जातो. सुस्थितीतील रस्ते असतील तर वाहतूक सुरळीत. पण आजकाल आपल्याइथल्या रस्त्यांची स्थिती पाहिली की खड्डे हीच आपली नवीन ओळख बनली आहे. आर्थिक राजधानी बृहन्मुंबई असो की विद्येचे माहेरघर असलेले पुणे (Pune) किंवा ‘आयटी’ सीटी बंगळूर असो, आपल्याकडे रस्त्यांमधील खड्डे चांद्रभूमीवरील खड्यांप्रमाणे जणू दीर्घकालीन आहेत.

शिवाय ते खड्डे बुजवण्याचा प्रयत्न देखील प्रचंड अफातून असतो म्हणजे खड्डे बुजविले जाण्याचा प्रयोग केला जातो, तोच मुळात ते पुन्हा पडावेत यासाठीच कि काय असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडायला लागला आहे. पावसाच्या एका सरीतच डांबर, सिमेंट सगळेच जैसे थे या स्थित येतात. ग्रामीण भागांत वाड्या, वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था हि आधी सुद्धा होती; पण जिथे उद्योग, व्यवसायांची ख्याती मिरवली जाते तिथेही तीच अवस्था निर्माण होत आहे तस असेल तर ‘स्मार्ट सिटी ‘ वगैरे शब्द शहरांसाठी वापरणेदेखील थट्टेखोर वाटते.

या सगळ्या बाबींची दाखल अखेर न्यायसंस्थेला घ्यावीच लागली. या खड्डयांमुळे एखाद्याचा बळी गेल्यास सहा लाख रुपयांची भरपाई वारसाला देण्यात यावी आणि स्थानिक यंत्रणा आणि रस्ते कंत्राटदाराला जबाबदार धरले जावे, असे निर्देश देखील दिले आहेत. “रस्ते सुरक्षा हा सर्वसामान्यांचा अगदी मूलभूत अधिकार आहे; पण तोही मिळणार नसेल तर त्याचा अट्टाहास धरणे मूर्खपणाचे. पण या सगळ्या बाबींवर न्यायालयाने ठोस विचार करून योग्य तो निर्णय घेतला देखील शिवाय यानिमित्ताने न्यायालयाने यंत्रणेला निर्वाणीचा इशारा देखील दिला आहे; पण शेवटी प्रत्येक गोष्टीत टक्केवारी शोधणारी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची लॉबी यामुळे सुधारेल, असा निष्पाप आशावाद बाळगणेही अर्थशून्य म्हणावे लागेल.

शरासारख्या ठिकाणी रास्ता दुरुस्तीच्या नावाखाली ठीक ठिकाणी खड्डे खोदून ठेवल्यामुळे वाटसरू पर्यायाने वाहने याना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. शिवाय जर त्या त्या भागातील लोक प्रतिनिधींनी पुढाकार घेऊन हा तिढा योग्य पद्धतीने सोडवला तर कदाचित रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी, खड्ड्यांमुळे होणारे अपघात कमी होण्यास मदत होईल. दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठेत अनेक जण खरेदीसाठी येतात खोदलेल्या खड्ड्यांमुळे आणि खड्डयांमुळेच झालेल्या वाहतूक कोंडीमुळे बाजरपेठेत पाय ठेवणे देखील मुश्किल झाले आहे अशी सामान्य जनतेची तक्रार आपण वारंवार ऐकतो.

आता खड्डयांमुळे अपघात होऊन जखमी झालेल्या नागरिकांना भरपाई देण्याचे आदेश देखील मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. अपघाताचे स्वरूप आणि त्याची तीव्रता लक्षात घेऊन मृतांच्या वारसांना भरपाईसाठी पन्नास हजार ते अडीच लाख रुपयांपर्यंतच्या भरपाईची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निकालाचे स्वागतच करायला हवे, हीच कल्पना देशभर गिरवण्यात आल्यास कदाचित काही गोष्टी सुधारण्यास मदत मिळू शकते. पण मूळ मुद्दा अजूनही तसाच राहतो तो म्हणजे रस्त्यावर सर्रास दिसणारे खड्डे. खड्डयांमुळे अपघात होणे आणि त्यात जीव जाणे किंवा जायबंदी होणे हा या समस्येचा एक मुख्य असा भाग झाला. पण खराब रस्त्यांमुळे इतरही अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते. या सगळ्यावर प्रशासन लवकरात लवकर तोडगा काढेल हीच आशा.


हे देखील वाचा – Mahesh Kothare: ‘भाजप म्हणजे आपलं घर; मी मोदींचा…’; महेश कोठारेंचे वक्तव्य चर्चेत

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या