Navi Mumbai Fire : दिवाळीच्या काळात मुंबई, नवी मुंबईसह (Navi Mumbai Fire) इतर शहरांत आगीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडताना दिसत आहेत. वाशी येथील सेक्टर १४ मधील ‘रहेजा रेसिडेन्सी’ या निवासी संकुलात मध्यरात्री भीषण आग(terrible fire) लागली. या आगीत एकूण ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यात ६ वर्षांच्या चिमुकलीसह ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० हून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे.
आग लागलेल्या इमारतीतून जवळपास १० ते १५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. जखमी झालेल्या १० हून अधिक लोकांना तातडीने फोर्टिस हिरानंदानी आणि एमजीएम रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नेण्यात आले.

मध्यरात्रीच्या सुमारास रहेजा रेसिडेन्सीमध्ये दहाव्या मजल्यावर ही आग लागली. त्यानंतर ही आग वेगाने पसरत गेली आणि ११ व्या आणि १२ व्या मजल्यावर आग पसरत गेली. या आगीने भीषण स्वरुप धारण केले. आग लागताच वाशी, नेरुळ, ऐरोली आणि कोपरखैरणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे तब्बल ४० जवान ही आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते, याशिवाय बचावकार्य देखील सुरु होते.
तर पनवेल परिसरात कामोठे सेक्टर ३६ मधील अंबे श्रद्धा इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याला पहाटे ५ वाजताच्या सुमारास आग लागली. या दुर्घटनेत रेखा सिसोदिया (४५) आणि पायल सिसोदिया (१९) या मायलेकीचा मृत्यू झाला. या कुटुंबातील इतर दोन सदस्य कामानिमित्त बाहेर असल्याने सुदैवाने ते बचावले. या आगीची माहिती मिळताच कळंबोली अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
याशिवाय मुंबईतील गोरेगाव पश्चिम परिसरात सरदार वल्लभभाई पटेल हॉलला मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती.या घटनेत संपूर्ण हॉल जाळून खाक झाला. सुदैवाने याठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग फटक्यांमुळे लागल्याची माहिती आहे.
हे देखील वाचा – Foldable iPhone: लवकरच लाँच होणार पहिला फोल्डेबल iPhone; भारतात किती असू शकते किंमत? जाणून घ्या