Home / देश-विदेश / Diwali Bonus : कंपनीने दिला कमी बोनस म्हणून कर्मचाऱ्यांनी थेट उघडला टोल गेट..यात तब्ब्ल ३० लाखांचं नुकसान..

Diwali Bonus : कंपनीने दिला कमी बोनस म्हणून कर्मचाऱ्यांनी थेट उघडला टोल गेट..यात तब्ब्ल ३० लाखांचं नुकसान..

Diwali Bonus : दिवाळीत बोनस मिळणं म्हणजे पर्वणीच पण प्रत्येकाला बोनस मिळतोच अस नाही किंवा काहींना कमी बोनस मिळतो. याच...

By: Team Navakal
Diwali Bonus

Diwali Bonus : दिवाळीत बोनस मिळणं म्हणजे पर्वणीच पण प्रत्येकाला बोनस मिळतोच अस नाही किंवा काहींना कमी बोनस मिळतो. याच संदर्भातील एक घटना उत्तर प्रदेशातील फतेहाबाद येथे घडली आहे. यात टोल टॅक्स कर्मचाऱ्यांनी दिवाळी बोनस कमी मिळाला म्हणून थेट टोल गेट उघडलं आणि तब्बल ५००० गाड्या टोल न भरता गेल्या. उत्तर प्रदेशातील फतेहाबाद या ठिकाणी ही घटना घडली आहे. लखनौ एक्सप्रेसवेवरून हजारो वाहने टोल टॅक्स न भरता गेली. कर्मचाऱ्यांनी कमी बोनस मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करत हे कृत्य केल्याची माहिती आहे.

जेव्हा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या व्यवस्थापकाला दिवाळी बोनस मागितला तेव्हा व्यवस्थापकाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, ज्यामुळे त्यांनी बूम बॅरियर्स उडवलं आणि गाड्या टोल न भरताच निघून गेल्या.

फतेहाबादटोल प्लाझाची जबाबदारी या वर्षी मार्चपासूनच श्री साई अँड दातार कंपनीकडे दिली गेली. या टोल प्लाझावर एकूण २१ कर्मचारी तैनात आहेत. कंपनीने दिवाळीला प्रत्येक कर्मचाऱ्याला बोनस दिला, मात्र कर्मचाऱ्यांना तो पुरेसा वाटला नाही. कंपनीने प्रत्येक कर्मचाऱ्याला १,१०० रुपये इतका बोनस दिला होता, परंतु कर्मचाऱ्यांनी गेल्या वेळी त्यांना ५००० रुपये बोनस मिळाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे, यावेळीही तोच बोनस मिळायला हवा होता, असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.


हे देखील वाचा –

Best CNG Cars: ‘या’ आहेत सर्वाधिक मायलेज देणाऱ्या 5 स्वस्त सीएनजी कार्स; किंमत फक्त 4.62 लाख रुपयांपासून

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या