Asia Cup Trophy Controversy: आशिया चषक 2025 जिंकूनही विजेत्या भारतीय क्रिकेट संघाला (Indian Cricket Team) अद्याप ट्रॉफीमिळालेली नाही. एशियन क्रिकेट कौन्सिचे ल (ACC) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी बीसीसीआयच्या (BCCI) पत्रानंतरही ट्रॉफी भारताकडे सोपवण्यास नकार दिला आहे.
या वादावर प्रतिक्रिया देताना नक्वी यांनी बीसीसीआयला थेट सूचना केली आहे की, त्यांनी एक समारंभ आयोजित करावा आणि ट्रॉफी घेण्यासाठी एका खेळाडूला थेट आपल्याकडे पाठवावे.
Asia Cup Trophy Controversy: वाद नेमका काय आहे?
आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवविजय मिळवला होता. मात्र, या स्पर्धेदरम्यान नक्वी यांनी केलेल्या राजकीय पोस्ट्समुळे, भारतीय खेळाडूंनी त्यांच्याकडून पदक आणि ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. याला उत्तर म्हणून नक्वी यांनी भारतीय संघाला पुरस्कार सोहळ्यापासून वंचित ठेवत, ACC च्या अधिकाऱ्याला ट्रॉफी घेऊन जाण्यास सांगितले होते.
ACC आणि BCCI च्या पत्रात नेमके काय?
30 सप्टेंबर रोजी झालेल्या ACC च्या वार्षिक बैठकीत बीसीसीआयने नक्वी यांच्या कृतीचा तीव्र निषेध करत ट्रॉफी भारताकडे त्वरित सोपवण्याची मागणी केली होती. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला ट्रॉफी अधिकृतपणे प्रदान करावी, असे ठामपणे सांगितले.
यावर बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, त्यांनी नक्वी यांना अधिकृत ईमेल (Email) पाठवून ट्रॉफीची मागणी केली आहे. उत्तर न मिळाल्यास आयसीसीकडे (ICC) हे प्रकरण नेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. श्रीलंका आणि अफगाणिस्तानच्या क्रिकेट बोर्डांनीही भारताला पाठिंबा दिला आहे.
नक्वी यांनी बीसीसीआयला पाठवलेल्या सविस्तर पत्रात भारतीय संघाचे अभिनंदन केले, पण त्याचवेळी क्रिकेटचे राजकारण केल्याबद्दल टीका केली.
नक्वी म्हणाले, पुरस्कार वितरण समारंभाबद्दल बीसीसीआयने ACC ला कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. प्रतिष्ठित पाहुण्यांसह मी 40 मिनिटे थांबलो, जेणेकरून समारंभाची अखंडता राखली जाईल. ACC ची ट्रॉफी भारतीय संघाचीच आहे, पण बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी उपलब्ध असलेल्या कोणत्याही खेळाडूच्या सोबत येऊन ती ACC अध्यक्षांकडून घ्यावी, अशी अट त्यांनी घातली आहे.
“बीसीसीआयबरोबर पत्रव्यवहार झाला आणि एसीसीने 10 नोव्हेंबरला भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, संपूर्ण संघ आणि बीसीसीआयचे राजीव शुक्ला यांच्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्याचे सुचवले. जिथे ट्रॉफी भारताला परत दिली जाईल.”, असे नक्वी म्हणाले.
हे देखील वाचा – Mahesh Kothare: ‘भाजप म्हणजे आपलं घर; मी मोदींचा…’; महेश कोठारेंचे वक्तव्य चर्चेत