India Pakistan Kabaddi: बहारीन येथे सुरू असलेल्या तिसऱ्या एशियन युथ गेम्समध्ये (Asian Youth Games) भारताच्या युवा कबड्डीपटूंनी दमदार कामगिरी केली आहे. मात्र, केवळ विजयानेच नव्हे तर एका मोठ्या वादानेही या सामन्याने लक्ष वेधून घेतले.
भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 81-26 अशा मोठ्या फरकाने पराभूत केले. या शानदार विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार इशांत राठी याने पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन करण्यास स्पष्टपणे नकार दिला.
सामन्यापूर्वी झालेल्या नाणेफेकीच्या वेळीच हा नाट्यमय प्रसंग घडला. भारतीय संघाने मैदानात आपले वर्चस्व सिद्ध केले आणि स्पर्धेतील अपराजित घोडदौड कायम ठेवली.
खेळातील ‘नो-हँडशेक’ वाद
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील खेळांमध्ये ‘नो-हँडशेक’ (No-Handshake) म्हणजेच हस्तांदोलन न करण्याची ही घटना नवी नाही. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या संघाने पाकिस्तानशी सामना झाल्यानंतर हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. त्यानंतर महिला क्रिकेट संघानेही 2025 विश्वचषकात हीच कृती केली.
🚨 BIG! Team India REFUSES to shake hands with Pakistan before the toss at the Asian Youth Games 2025.
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) October 21, 2025
Later, India CRUSHED Pakistan 81–26 in a one-sided Kabaddi match 🔥 pic.twitter.com/vrGGr52rOC
त्यानंतर आता 20 ऑक्टोबर रोजी बहारीनमध्ये झालेल्या कबड्डी सामन्यात भारतीय संघाने केलेला हा निषेध भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले होते, तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ मुळे दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले आहेत.
कबड्डीत भारताचा दबदबा
एशियन युथ गेम्समध्ये कबड्डीचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या स्पर्धेत 7 संघ ‘राऊंड रॉबिन’ पद्धतीने खेळत आहेत. भारताने आतापर्यंत खेळलेले सर्व 3 सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. यापूर्वी भारताने बांगलादेशला 83-19 आणि श्रीलंकेला 89-16 अशा मोठ्या फरकाने हरवले आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
हे देखील वाचा – Asia Cup Trophy Controversy: ‘भारताला आशिया कपची ट्रॉफी हवी असेल तर…’; उद्धट नक्वींनी BCCI समोर ठेवली नवीन अट