Home / महाराष्ट्र / Bhiwandi Fire : भिवंडीत पुन्हा एकदा अग्नितांडव; कपड्यच्या गोदामाला भीषण आग..

Bhiwandi Fire : भिवंडीत पुन्हा एकदा अग्नितांडव; कपड्यच्या गोदामाला भीषण आग..

Bhiwandi Fire : भिवंडी (Bhiwandi) शहर आणि ग्रामीण भागात आगीची मालिका सुरूच आहे. आजही शहरानजीकच्या राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील मुनीसुरत कंपाऊंड...

By: Team Navakal
Bhiwandi Fire

Bhiwandi Fire : भिवंडी (Bhiwandi) शहर आणि ग्रामीण भागात आगीची मालिका सुरूच आहे. आजही शहरानजीकच्या राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील मुनीसुरत कंपाऊंड येथील महादेव मढवी कॉम्प्लेक्स मधील कपड्याच्या गोदामास पहाटेच्या सुमारास ज्वलंत आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची तीव्रता अधिक असल्यामुळे गोदाम जळून खाक झाले आहे. आगीची तीव्रता इतकी जास्त होती की दुसऱ्या मजल्याच्या भिंती कोसळल्या.

आगीचे कारण अद्यापहि स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असला तरी अधिकृत पुष्टी अद्याप देखील करण्यात आलेली नाही. पहाटे धुराचे लोट दिसताच स्थानिकांनी अग्निशमन विभागाला कळवले. भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन तसेच ठाणे महापालिकेची एक अशा तीन गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. परंतु पाण्याचा तुटवडा भासल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठीचे प्रयत्न अधिकच आव्हानात्मक होत गेले.

सुदैवाने, या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. मात्र कपड्यांचा मोठ्या प्रमाणावर साठा जळून खाक झाल्यामुळे आर्थिक नुकसाला सामोरे जावे लागले.


हे देखील वाचा – 

India Pakistan Kabaddi: क्रिकेटनंतर कबड्डीतही ‘नो हँडशेक’ वाद; भारतीय कर्णधाराने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळले

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या