Home / देश-विदेश / Mehul Choksi: फरार मेहुल चोक्सीला लवकरच भारतात आणणार; मुंबईतील ‘या’ जेलमध्ये ठेवणार, पाहा फोटो

Mehul Choksi: फरार मेहुल चोक्सीला लवकरच भारतात आणणार; मुंबईतील ‘या’ जेलमध्ये ठेवणार, पाहा फोटो

Mehul Choksi Extradition: पीएनबी (PNB) बँक घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला (Mehul Choksi) मोठा झटका बसला आहे. भारताला प्रत्यार्पणाविरुद्ध...

By: Team Navakal
Mehul Choksi Extradition

Mehul Choksi Extradition: पीएनबी (PNB) बँक घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला (Mehul Choksi) मोठा झटका बसला आहे. भारताला प्रत्यार्पणाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना बेल्जियम कोर्टानेचोक्सीच्या विरोधात निर्णय दिला आहे.

कोर्टाने स्पष्ट केले आहे की, चोक्सीवरील आरोप इतके गंभीर आहेत की त्याच्या प्रत्यार्पणाला कोणतीही कायदेशीर अडचण नाही.

13,850 कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालयाला (ED) मेहुल चोक्सी हवा आहे. चोक्सी 66 वर्षांचा असून, तो 2 जानेवारी 2018 रोजी भारतातून पळून गेला होता.

आर्थर रोड जेलचे पुरावे सादर

2018 मध्ये चोक्सीने इंटरपोलला दिलेल्या सीबीआयच्या रेड कॉर्नर नोटीसविरुद्ध याचिका दाखल केली होती. त्यावेळी त्याने भारतीय तुरुंगांची स्थिती चांगली नसल्याचे आणि मानवाधिकार नियमांचे उल्लंघन होत असल्याचे कारण दिले होते.

सुनावणीत बेल्जियम कोर्टासमोर मुंबईतील आर्थर रोड जेलच्या आर्किटेक्चरल ड्रॉइंग्स आणि आतील भागाचे फोटो सादर करण्यात आले. चोक्सीला तुरुंगातील सामान्य वॉर्डमध्ये न ठेवता, त्याला चांगली हवा असलेल्या, सुरक्षित आणि देखरेख असलेल्या कोठडीत ठेवले जाईल, हे दाखवण्यासाठी हे पुरावे जोडण्यात आले होते.

चोक्सीला मुंबईतील ज्या जेलमध्ये ठेवले जाणार आहेत, त्याचे फोटो देखील समोर आले आहेत. त्याला आर्थर रोड जेलच्या बराक क्रमांक 12 या ठिकाणी ठेवले जाईल. या बराकमध्ये दोन सेल्स आणि स्वच्छतागृहाची सुविधा असणार आहे.

बेल्जियम कोर्टाने शुक्रवारी चोक्सीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. मात्र, कोर्टाच्या या निर्णयाविरोधात चोक्सीला पुढील 15 दिवसांत बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार आहे.

हे देखील वाचा –  EPFO Rules: नोकरी सोडल्यावर पैसे काढणे झाले कठीण! EPFO ने EPS चे नियम बदलले

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या