Ravindra Dhangekar : गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात एक नाव सातत्याने चर्चेत असल्याचं दिसून येत आहे. आणि ते म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar). धंगेकरांनी महायुतीतील मित्रपक्षातील बड्या नेत्यांवर टीका करत गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरुड भागात घायवळ टोळीच्या गुंडांनी गोळीबार केल्याची घटना घडली.
या घटनेवरून धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) भाजपचे नेते आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. धंगेकरच्या मते निलेश घायवळ आणि त्यांच्या निकटवर्तीयाचे चांगले संबंध असल्याचं म्हटलं होतं.
२०२४ ला एक जण मिडियामध्ये बातम्या पेरून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आला होता, तो कोण आहे आदरणीय फडणवीस साहेबांना माहित आहे.
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) October 22, 2025
आज तोच घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्यावर पक्ष कारवाई झाल्याच्या बातम्या खोट्या बातम्या पेरतोय..!
मन में हैं विश्वास..!
हम होंगे कमयाब…!!#SaveHDN…
चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय समीर पाटील हे घायवळ टोळीला आश्रय देत असल्याचं आणि मदत करत असल्याचा खळबळजनक आरोप देखील त्यांनी केला होता. त्यानंतर धंगेकरांनी पुण्यातील जैन बोर्डींगच्या जमीन घोटाळ्यावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सुद्धा हल्लाबोल केला. त्यांनी मोहोळ यांच्यावर जमीन हडपल्याचा मोठा आरोप केला आहे. या आरोपानंतर धंगेकरांना एकनाथ शिंदे यांनी समज दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर देखील धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) आरोपांची मालिका सुरूच ठेवली, त्यानंतर आता पुन्हा एकदा धंगेकर यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. या चर्चेवर स्वत: रवींद्र धंगेकर पूर्णविराम लावल्याचे दिसून येत आहे.
पण या सगळ्या गोष्टींनंतर देखील धंगेकर थांबले नाहीत. त्यांनी पंगा एकदा नाव न घेता मुरलीधर मोहळ यांच्यावर निशाणा साधला आहे. सोशल मिडिया एक्सवर पोस्ट करत हल्लाबोल केला आहे. धंगेकर पोस्टमध्ये म्हणतात की, २०२४ला एक जण मीडियामध्ये बातम्या पेरून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत उतरला होता. तो कोण आहे, हे आदरणीय फडणवीस साहेबांना सुद्धा माहीत आहे. आज तोच घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्यावर पक्ष कारवाई झाल्याच्या थोतांड बातम्या पेरतोय..! मन में हैं विश्वास..! हम होंगे कमयाब…!!, अशी पोस्ट करत त्याही मोहळानां खोचक टोला लावला आहे. शिवाय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील या पोस्टमध्ये टॅग केलेलं आहे.
शिवसेना हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे.आदरणीय पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेबांनी अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या शिवसैनिकावर आजपर्यंत कारवाई केलेली नाही.अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांचं नेहमी पाठबळ राहील, असा मला विश्वास आहे.
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) October 22, 2025
आणि…
सध्या रवींद्र धंगेकरांवर कारवाई होणार असल्याच्या चर्चाना उधाण आलेलं असताना त्यांनी स्वतः पोस्ट करून या संबंधित बातम्या खोट्या असल्याचं स्पष्ट केलं आहे. याआधीही धंगेकर ट्वीट करत म्हणाले आहे कि एकनाथ शिंदे आपल्यावर अन्याय होऊ देणार नाहीत, अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांचं पाठबळ आम्हाला नेहमी राहील, असं ट्विट देखील त्यांनी केलं आहे.
हे देखील वाचा – World’s Longest Car: चालता-फिरता राजवाडा! ‘ही’ आहे जगातील सर्वात मोठी कार; सुविधा पाहून थक्क व्हाल