Delhi Taj Hotel : दिल्लीतील ताजमहाल हॉटेलमध्ये (Taj Mahal Hotel) ‘युअरस्टोरी’च्या संस्थापक आणि सीईओ श्रद्धा शर्मा (Shraddha Sharma) यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे आता नवा वाद उदयास आला आहे. श्रद्धा शर्मा यांना कोल्हापुरी चप्पल आणि मांडी घालून बसल्याने अपमानास्पद वागणूक देण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ स्वतः श्रद्धा शर्मा यांनी शेअर करत हॉटेल व्यवस्थापनाच्या वागणुकीवर संताप व्यक्त केला आहे.
कोल्हापुरी चप्पल आणि सलवार कमीज परिधान केलेल्या शर्मा या हॉटेलमध्ये मांडी घालून बसल्या होत्या, ज्यावर हॉटेलच्या मॅनेजरने आक्षेप घेत म्हणाला ‘हे एक फाईन डायनिंग रेस्टॉरंट आहे आणि येथे श्रीमंत लोक येतात, त्यामुळे तुम्ही सुव्यवस्थित बसावे,’ असे मॅनेजरने म्हटल्याचा आरोप श्रद्धा शर्मा यांनी केला आहे. इतकेच नाही तर, त्यांना ‘क्लोज्ड शूज’ घालण्याचा सल्ला देखील देण्यात आला, ज्यामुळे हा नवा वाद उदयास आला आहे.
एक आम इंसान, जो मेहनत करके, अपना पैसा कमा कर, अपनी इज़्ज़त के साथ ताज होटल में आता है — उसे आज भी इस देश में ज़लील और अपमानित होना पड़ता है।
— Shradha Sharma (@SharmaShradha) October 21, 2025
और मेरी गलती क्या है? सिर्फ़ ये कि मैं बैठ गई एक “regular padmasana style” में?
क्या ये मेरी गलती है कि ताज मुझे सिखा रहा है कि कैसे बैठना… pic.twitter.com/vKBYjg8ltb
दरम्यान, या बाबत स्वतः श्रद्धा शर्मा (Shraddha Sharma) यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेयर करत घडलेल्या प्रकारचा संताप व्यक्त केला आहे. ‘एक सामान्य माणूस जो कठोर परिश्रम करतो, स्वतःचे पैसे कमवतो आणि आपल्या प्रतिष्ठेसह हॉटेलमध्ये येतो, त्याला अजूनही या देशात ” असं श्रद्धा शर्मा तिच्या व्हिडिओमध्ये म्हणालीय. पुढे ती अपमानास्पद वागणूक मिळते त्या पुढे असंही म्हणाल्या कि, “माझी चूक काय आहे? मी फक्त नियमित पद्मासन शैलीत बसले म्हणून?” श्रद्धा शर्मा यांनी स्पष्ट केले की ती तिच्या बहिणीसोबत दिवाळीच्या जेवणासाठी बाहेर गेली होती. त्यावेळी हा संतापजनक प्रकार घडला. या सगळ्या प्रकारावर सोशल मीडियावरूनही संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, श्रद्धा पुढे म्हणाल्या की, मला हे समजते की हे एक ‘चांगले रेस्टॉरंट आहे, अर्थातच, खूप प्रचंड श्रीमंत लोक येतात आणि ते तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीने बसून बंद शूज घालण्याची अपेक्षा ठेवतात’. “मात्र मला हे काळत नाही कि, मी कोल्हापुरी चप्पल घालते, जी मी माझ्या स्व: कष्टाच्या पैशाने विकत घेतली होती आणि इथे मी सभ्य पोशाख घालून आले होते. पण ‘पाय खाली ठेवा’ असे सांगणे किंवा माझी बसण्याची पद्धत आक्षेपार्ह होती, हे सांगणं अत्यंत चुकीचे आहे. मी कठोर परिश्रम करते, म्हणूनच मी इथपर्यंत पोहोचली आहे. मी स्वतः या जेवणाचा खर्च करत आहे, मग अडचण कुठे आहे? अस म्हणत तिने प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा –