Thackeray Bhaubeej : गेल्या काही काळापासून सगळ्यात जास्त चर्चेत असलेली जोडी ती म्हणजे ठाकरे बंधू आगामी काळात येणाऱ्या मुंबई महापालिका (Mumbai) आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे आता जवळपास सुनिश्चित झालं आहे. कारण,मागच्या ४ महिन्यात ठाकरे बंधू आणि ठाकरे कुटुंब वारंवार एकत्र आल्याचे दिसून आले आहे. त्यातच आज सकाळपासूनच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भाऊबीज निमित्त एकत्र येण्याची चर्चा रंगली होती, आता या चर्चाना पुढे नेट पुन्हा एकदा राज (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भाऊबीज सणानिमित्ताने बहिणीच्या घरी एकत्र आले आहेत.

उद्धव आणि राज ठाकरे त्यांच्या चुलत बहीण जयजयवंती यांच्या घरी भाऊबीजेसाठी एकत्र आले आहेत. त्यानिमित्ताने ठाकरे बंधू आणि कुटुंब एकत्र आल्याचे दृश्य आहेत. आदित्य आणि तेजस ठाकरे हेही ठाकरे कुटुंबातील भाऊबीज स्नेह भोजन कार्यक्रमानिमित्त एकत्र आल्याचे दिसून आले. त्यामुळे, गेल्या ४ महिन्यातील ही ठाकरे बंधूची आजची ९ वी भेट आहे असे म्हणायला हरकत नाही.
काही दिवसांपूर्वी दीपावली दीपोत्सवा निमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, यांसह ठाकरे कुटुंब एकत्र आले होते. त्यावेळी, दोन्ही कुटुंबातील स्नेहबंध महाराष्ट्राला पाहायला मिळाले. त्यामुळेच, आता ठाकरे बंधुच्या युतीची औपचारिक घोषणा कधी होणार याची वाट अवघा महाराष्ट्र पाहत आहे असं म्हणायला हरकत नाही.

दरम्यान, ठाकरे बंधूंच्या या वारंवार भेटीवर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत आहेत, विरोधकांकडून या भेटीवर बोचरी टीका केली जात आहे. तर, काही जणांकडून दोन बंधू एकत्र येत असतील तर हा चागंली गोष्ट आहे असे देखील बोलले जात आहे.
हे देखील वाचा –