Jogeshwari Fire : मुंबईत सध्या आगीच्या घटना सतत घडत असलायचं चित्र दिसून येत आहे. ताज्या घटनेत जोगेश्वरी (Jogeshwari Fire) परिसरातील एका इमारतीत भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते.
ही आग इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत पसरली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर (Jogeshwari Fire) अखेर आग नियंत्रणात आणण्यात यश मिळाले. संबंधित अधिकाऱ्यांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे. या आगीमध्ये अनेक जण अडकले होते, त्यांना बाहेर काढण्यात यश आले.
जोगेश्वरी मध्ये जेएमएस बिजनेस पार्क इमारतीमध्ये लागलेली हि आग तब्बल ४ तासाच्या अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मोठ्या चुकीमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
इमारतीमध्ये ओसी (OC) नसताना मोठा संख्येमध्ये लोकं भाड्याने गोदाम आणि दुकान घेऊन ते चालवत होते. पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे आगीची घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. सध्या १६ ते १७ लोकांना या आगीमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, तर पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. ओसी (OC) नसताना विकासकाने इमारतीमधील दुकान भाड्याने कशी दिली, त्याचसोबत यामध्ये पालिकेने का दुर्लक्ष केलं या संदर्भात अधिक तपास ओशिवरा पोलीस करत आहेत.
ओसी नसताना सुद्धा इमारतीमध्ये लोकांना भाड्यावर दुकाने दिली गेली. त्यामुळे ओशिवरा पोलीस ठाण्यात आता डेव्हलपर वर कारवाई करण्याची तयारी करत आहेत. शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांनी देखील घटनास्थळी पोहचून परिस्थितीचा आढावा घेतला. सकाळी १०:३० सुमारास इमारतीचा एका गाळ्यामध्ये ही मोठी आग लागली. मात्र नंतर आग चार माळ्यांवर पसरत गेली. घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. हि आग विझविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले गेले.
हे देखील वाचा – Delhi Taj Hotel : ताज हॉटेलमध्ये कोल्हापुरी चप्पल घातल्याने केला अपमान; सोशल मिडियावर नेटकऱ्यानी केला संताप व्यक्त..