BMW Car – लोकपाल अध्यक्ष (Lokpal Chairperson)आणि सात सदस्यांसाठी प्रत्येकी ७० लाख रुपये किंमतीच्या आलिशान बीएमडब्लू गाड्या खरेदी करण्याचा निर्णय १६ ऑक्टोबर रोजी जारी केला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Activist Anna Hazare)आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी (IPS officer Kiran Bedi)यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
अण्णा हजारे म्हणाले की, भ्रष्टाचाराला (corruption)आळा घालण्यासाठी आम्ही लोकपाल चळवळ (Lokpal movement) उभारली, संघर्ष केला. त्यातूनच ही लोकपाल संस्था अस्तित्वात आली. लोकपालची स्थापना ही भ्रष्टाचार थांबवण्यासाठी झाली. पण आता जर लोकपालच भ्रष्टाचार होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या निर्णयांमध्ये सहभागी होत असेल. तर ती अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.
तर माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी म्हणाल्या की, लोकपालची निर्मिती वायफळ खर्चासाठी केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः स्वदेशीचा पुरस्कार करतात. मग लोकपालसाठी परदेशी गाड्या का घेतल्या जात आहेत? आपल्या देशात टाटा, महिंद्रा यांसारख्या उत्कृष्ट भारतीय गाड्या आहेत, मग परदेशी कार घेण्याची गरज काय? हा निर्णय मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या विरोधात आहे.
हे देखील वाचा –
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज लेफ्टनंट कर्नल बनला
न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरण ; हितेश मेहताचा जामीन फेटाळला
सोशल मीडियावरील कंटेंट हटवण्याचे नियम बदलले; केवळ ‘या’ अधिकाऱ्यांना असणार अधिकार