1993 Bomb Blast – अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt)याला शस्त्रांचे वेड होते. त्यामुळे त्यांनी शस्त्र बाळगले असावे. त्याचा बॉम्बस्फोटात सहभाग नव्हता, असे वक्तव्य १९९३ बॉम्बस्फोट खटल्याचे सरकारी वकील व भाजपा खासदार उज्वल निकम (Prosecutor Ujjwal Nikam)यांनी केले. एका युट्युब वाहिनीवरील मुलाखतीत त्यांनी हे विधान केले.
Pleased to share my recent podcast with @shubhankrmishra.
— Adv. Ujjwal Nikam (@miujjwalnikam) October 22, 2025
We discussed several key topics: the facts surrounding the Kasab 'biryani' story, details of the 26/11 trial, the Gulshan Kumar case, Abu Salem's letter, and other notable cases.
I also offered insights into my journey…
या बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त खरोखर दोषी होता का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले की, मला असे वाटत नाही. त्याचा बॉम्बस्फोटाशी थेट संबंध नव्हता. या बॉम्बस्फोट कटातही तो सहभागी नव्हता. त्याला केवळ शस्त्रांचे वेड असावे. त्यामुळे त्याने अबू सालेमकडून (Abu Salem) एके-४७ रायफल (AK-47 rifle)घेतली. त्याने शस्त्र घेण्याची इच्छा दाखवल्यानंतर अबू सालेमने त्याच्याकडे एक टेम्पो भरून शस्त्रे पाठवली होती.
त्यातील त्याने केवळ एकच एके-४७ रायफल घेतली. त्यामुळे तो बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरला. त्याला ७ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. ज संजय दत्तने त्या टेम्पोची कल्पना पोलिसांना दिली असती तर कदाचित हे बॉम्बस्फोट टाळता आले असते. कारण याच टेम्पोमध्ये आरडीएक्सही (RDX)होते.
विशेश म्हणजे, संजय दत्तने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) १०० वर्षे झाल्यानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. आता त्याचा १९९३ च्या बॉम्बस्फोटाशी संबंध नव्हता, असे प्रमाणपत्र मिळत आहे.
हे देखील वाचा –
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज लेफ्टनंट कर्नल बनला