Jio Prepaid Plan: रिलायन्स जिओ कंपनी ग्राहकांना वेगवेगळ्या किंमतीमध्ये अनेक प्रीपेड प्लॅन रिचार्ज करण्याचा पर्याय देत आहे. यापैकी अनेक प्लॅन्समध्ये ग्राहकांना ओटीटी सेवांचे सब्सक्रिप्शन दिले जाते.
जिओच्या काही निवडक प्लॅन्समध्ये युजर्सना नेटफ्लिक्सचे ॲक्सेस पूर्णपणे मोफत मिळत आहे. जिओच्या या आकर्षक प्लॅन्सबद्दलची माहिती खालीलप्रमाणे आहे.
1. 1799 रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन
- जिओचा हा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो.
- या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटाचा फायदा मिळतो.
- सर्व नेटवर्क्सवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS करण्याची सुविधा मिळते.
- या प्लॅनमध्ये ग्राहकांना नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन मोफत दिले जात आहे.
- या प्लॅनसाठी पात्र असलेल्या युजर्सना अमर्यादित 5G डेटाचा लाभ देखील मिळतो.
2. 1299 रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन
- जर तुम्हाला कमी किंमतीत आणि जास्त वैधतेसह नेटफ्लिक्स मोफत हवे असेल, तर तुम्ही 1299 रुपयांच्या प्लॅनची निवड करू शकता.
- या प्लॅनची वैधता देखील 84 दिवसांची आहे.
- यामध्ये दररोज 2GB डेटाचा फायदा मिळतो.
- यामध्येही अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह दररोज 100 SMS पाठवण्याचा पर्याय दिला जातो.
- या प्लॅनमध्येही नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन मोफत मिळते.
- हा प्लॅन निवडणाऱ्या पात्र युजर्सना अमर्यादित 5G डेटाचा लाभ मिळतो.
Jio Prepaid Plan: अतिरिक्त फायदे
या दोन्ही प्लॅनमध्ये रिचार्ज केल्यास युजर्सना जिओटीव्ही आणि जिओएआयक्लाउड ॲप्सचा ॲक्सेस मिळतो. तसेच, जिओच्या स्पेशल ऑफर बेनिफिट्ससह, जिओ हॉटस्टारचे 3 महिन्यांचे सब्सक्रिप्शन देखील दिले जात आहे.
हे देखील वाचा – 1993 Bomb Blast : संजय दत्तला शस्त्रांचे वेड बॉम्बस्फोटात सहभाग नाही ! उज्ज्वल निकमांचे वक्तव्य









