Satara Crime : सातारामधील फलटण (Satara Crime News) मधील एक मोठी धक्कादायक घटना समोर आली आहे. फलटण उपजिल्हा रूग्णालयातील (Phaltan Sub District Hospital) महिला डॉक्टरनेच आत्महत्या केली आहे. या डॉक्टर महिलेचं नाव संपदा मुंडे असून या महिला डॉक्टरच्या हातावर पेनाने सुसाईड नोट देखील लिहिली आहे. या सुसाईड नोटमध्ये तिने आत्महत्येचं कारण देखील लिह०ल आहे. या नोटमध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये त्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन झाले असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण? (Satara Doctor Crime News)
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रूग्णालयात महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मात्र आता या आत्महत्या प्रकरणाला एक वेगळी दिशा मिळाली आहे. मृत डॉक्टर महिलेच्या हातावर सुसाईड नोट आढळली आहे. या सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरने आपल्यावर बलात्कार झाल्याचा गंभीर खुलासा केला आहे. त्यात या महिलेने पोलीस निरीक्षक गोपाल बदनेचं नाव लिहीलंय. या पोलीसनिरीक्षकाने तिच्यावर चारवेळा बलात्कार केल्याचं देखील या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. तसंच पोलीस प्रशांत बनकर यानेही मानसिक छळ केल्याच या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय.

मागच्या काही महिन्यांपासून त्या पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या अशी माहिती मिळाली. वैद्यकीय तपासणीअंतर्गत पोलिसांशी वादानंतर त्यांची चौकशी सुरू होती अशी माहिती समोर आली. या चौकशीदरम्यान त्यांनी आपल्या वरिष्ठांना लेखी स्वरूपात तक्रार दिली होती त्यात ती म्हणाली,“माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन.” असं तिनं त्या तक्रारीत लिहल आहे. तथापि, त्यांच्या या तक्रारीकडे वरिष्ठांकडून कोणत्याहीप्रकारची ठोस दखल घेण्यात आली न्हवती, असा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांकडून वारंवार केला जात आहे. शेवटी गुरुवारी रात्री महिला डॉक्टरने आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आपली जीवन गाथा संपली आहे. तिच्या हातावर आढळलेल्या सुसाईड नोटमुळे आत्महत्येचे प्रकरण आता गुन्हेगारी स्वरूपात बाहेर येत आहे.
या प्रकरणात पोलिसांनी सकाळ पासून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली असा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर दुपारी दोन्ही आरोपींवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गोपाल बदनेचे निलंबन करण्यात आले.प्रशांत बनकर हा फलटण पोलिसात असल्याचे सांगितले जात होते पण तो इंजिनियर असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
संपदाच्या कुटुंबीयांनी यावर अधिक माहिती देत सांगतिले कि, मागील वर्षभरापासून तिच्यावर राजकीय तसेच पोलिसांकडून दबाव चुकीचे आणि खोटे शवविच्छेदन अहवाल बनवण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. तिची बहीण मेडिकल ऑफिसर आहे. संपदा घरी सगळ सांगत नव्हती. पण ती आपल्या बहिणीला याबाबत सांगायची. तिने जून – जुलै महिन्यात पोलीस उपअधीक्षकांकडे याबाबत तक्रार केली होती. पण कारवाई झाली नाही. तीन ४ पानाची एक चिट्ठी दिली होती. त्यात खासदारांच्या २ स्वीय सहायकांचे आणि महाडिक नावाच्या व्यक्तीचा उल्लेख होता. आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे.अशी मागणी आता तिच्या कुटुंबिय करत आहेत.
शिवाय आता या प्रकरणावर बऱ्याच नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरवात केली आहे. याबाबत साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, मला आत्तापर्यंत या घटनेचे अधिकृत माहिती अधिकाऱ्यांकडून स्पष्ट झालेली नाही. मी एसपींशी या बाबत बोललो आहे. त्यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले आहे. या प्रकरणाचा खोलवर तपास करू. या प्रकरणातील सर्व पुरावे देखील गोळे करू. मुलीच्या नातेवाईकांशी संपर्क साधू शिवाय त्यांचा अजून कोणावर संशय असेल तर त्यांची देखील माहिती घेऊ. या घटनेत जो कोणी दोषी असेल तरी त्याला सोडणार नाही.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही घटना अत्यंत धक्कादायक अशी आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रात अशा घटना होत आहेत ही अतिशय खेदजनक बाब आहे. या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करणे भाग आहे. जे कोणी हे कृती कृत्य केल आहे त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
हे देखील वाचा –
Donald Trump Decision : रशियावर लादलेल्या निर्बंधांची झळ भारताला बसेल का?









