Home / महाराष्ट्र / सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नामकरण; केंद्र सरकारने ‘या’ नावाला दिली मंजूरी

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नामकरण; केंद्र सरकारने ‘या’ नावाला दिली मंजूरी

Sangli islampur Rename: महाराष्ट्रातील शहरांच्या नामांतराच्या मालिकेमध्ये आता सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचा समावेश झाला आहे. सांगली जिल्ह्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचे मानले...

By: Team Navakal
Sangli islampur Rename

Sangli islampur Rename: महाराष्ट्रातील शहरांच्या नामांतराच्या मालिकेमध्ये आता सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचा समावेश झाला आहे. सांगली जिल्ह्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचे मानले जाणारे इस्लामपूर शहर आता अधिकृतपणे ईश्वरपूर या नावाने ओळखले जाणार आहे.

राज्य सरकारने केलेल्या नामकरण प्रस्तावाला केंद्र सरकारने अखेर मंजुरी दिली आहे, ज्यामुळे नामांतराचा मार्ग मोकळा झाला आहे.

महायुती सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील अनेक शहरे आणि जिल्ह्यांच्या नामांतराची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण झाल्यानंतर इस्लामपूरचे नाव बदलण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानुसार, सरकारने ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी इस्लामपूरचे नाव ‘ईश्वरपूर’ करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. राज्य सरकारच्या या प्रस्तावावर केंद्राची मंजुरी मिळाल्याने आता सर्व शासकीय नोंदी, कागदपत्रे आणि फलकांवर ‘इस्लामपूर’ ऐवजी ‘ईश्वरपूर’ असे नाव दिसणार आहे.

इस्लामपूर शहर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांचा मतदारसंघ असून, नामांतराच्या यादीत आणखी एका शहराची भर पडल्याने राजकीय वर्तुळात या निर्णयाची मोठी चर्चा आहे.

हे देखील वाचा – Donald Trump : रशियातील तेल खरेदीत भारत कपात करणार; ट्रम्प यांचा पुन्हा दावा

Web Title:
संबंधित बातम्या