Bigg Boss 19 : बिग बॉस म्हणजे सगळ्यात मोठा प्रेक्षक वर्ग असलेला सगळ्यात जास्त प्रसिद्ध असा रिऍलिटी शो आहे. सलमान खानचा वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस १९ मध्ये मोठा ट्विस्ट येणार असल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगते आहे.
या सिझनमध्ये सातत्याने नो एव्हिक्शन असा अविरत चालत आलेले धोरण आता तुटणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता निर्मात्यांनी थेट डबल एव्हिक्शनची टांगती तलवार आता खेळाडूंच्या डोक्यावंर ठेवली आहे. या वेळी सलमान खानच्या उपस्थितीत एक नाही तर २ स्पर्धक या खेळातून बाहेर जाणार असल्याची माहिती सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे.
या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी एकूण चार स्पर्धक नॉमिनेट झाले होते, त्यात मराठा मोळा प्रणित मोरे, गौरव खन्ना,नेहल चुडासमा, आणि स्प्लिट्सविला विजेता बसीर अली. काही मीडिया रिपोर्ट्स नुसार सर्वात कमी मतं पडून नेहल चुडासमा हिला घराबाहेरच रस्ता दाखवला आहे. याशिवाय डबल एव्हिक्शनमध्ये, बसीर अलीच सुद्धा नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. या आधीही बसीर त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत होता. आणि त्याचा खोटा प्रेमाचा दिखावा देखील प्रेक्षकांना नाखूष करणारा होता.
पण या उलट दुसरीकडे, बसीर अलीच्या टीमकडून ही एक्झिटची बातमी खोटी असल्याचा दावा केला जात आहे. बसीर सुरक्षित असून तो अजूनही शोचा भाग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे यावेळी सलमान खान कोणाचं नाव घेईल याकडे सगळ्याच लक्ष लागलेलं आहे.
हे देखील वाचा – Mahesh Manjrekar on Salman khan : सलमान खानसोबत चित्रपट करायला महेश मांजरेकरांचा नकार? सलमानच्या चित्रपटांबद्दल महेश मांजरेकरांचं मोठं विधान..









