Home / News / Mann Ki Baat – Modi : मन की बातमध्ये मोदींनी गार्बेज कॅफेचे कौतुक केले

Mann Ki Baat – Modi : मन की बातमध्ये मोदींनी गार्बेज कॅफेचे कौतुक केले

Mann Ki Baat – Modi – छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये सुरू झालेल्या गार्बेज कॅफेने देशाचे लक्ष वेधले आहे. प्लास्टिक कचरा देऊन त्याबदल्यात...

By: Team Navakal
Mann Ki Baat - Modi -

Mann Ki Baat – Modi – छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये सुरू झालेल्या गार्बेज कॅफेने देशाचे लक्ष वेधले आहे. प्लास्टिक कचरा देऊन त्याबदल्यात येथे अन्न दिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या १२७ व्या भागात या उपक्रमाला देशासाठी आदर्श म्हणत कौतुक केले. याशिवाय त्यांनी छठ पूजेसाठी शुभेच्छा दिल्या आणि जीएसटी बचत महोत्सव, सरदार पटेल यांची १५० वी जयंती आणि रन फॉर युनिटी यासारख्या विषयांवरही मत मांडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अंबिकापूरमध्ये सुरू झालेले गार्बेज कॅफे हे केवळ पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल नाही. तर सामाजिक संवेदनशीलतेचे प्रतीक आहे. आपण निश्चय केला तर काहीही अशक्य नाही.

याठिकाणी प्रत्येकी किलो प्लास्टिकसाठीच्या बदल्यात डाळ, भात, दोन भाजी आणि पोळी, सलाड असे जेवण तर अर्धा किलो प्लास्टिकच्या बदल्यात समोसा, वडापाव किंवा आलू चाप असा नाष्टा दिला जातो. या उपक्रमांमुळे शहर स्वच्छ ठेवण्याबरोबरच गरिबांना सन्मानाने अन्न मिळते. अशा उपक्रमामुळे देशभरातील नागरिकांना प्रेरणा मिळते.

ते पुढे म्हणाले की,आपण सर्वांनी नुकतीच दिवाळी साजरी केली. आता मोठ्या संख्येने लोक छठ पूजेची तयारी करत आहेत. छठ सण हा संस्कृती, निसर्ग आणि समाजाच्या खोल ऐक्याचे प्रतिबिंब आहे. तर ऑपरेशन सिंदूरने खरोखरच प्रत्येक भारतीयाला अभिमानाने भरून टाकले आहे. यंदा नक्षलवाद्यांच्या दहशतीत असलेले भागही आनंदाने उजळून निघाले होते.

जीएसटी बचत महोत्सवात लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला. बाजारपेठांमध्ये स्वदेशी वस्तूंच्या खरेदीत लक्षणीय वाढ झाली. ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती आहे. त्यानिमित्त आयोजित रन फॉर युनिटी आयोजित केले आहे. त्यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.


हे देखील वाचा –

मोंथा चक्रीवादळाचा धोका ; आंध्र किनाऱ्यावर रेड अलर्ट

३० दिवसांत ग्रॅच्युइटी द्या ; अन्यथा आंदोलन करणार ! निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांचा इशारा

एलआयसीवर केंद्राचा दबाव; अदानीत अब्जावधीची गुंतवणूक

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या