Jain boarding controversy – पुण्यातील मॉडेल कॉलनीतील शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या जमिनीच्या (Jain boarding controversy) विक्री प्रकरणी उद्या जैन समाजाकडून देशभरात आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले जाणार आहे. या प्रकरणी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या उपस्थितीत बोर्डिंग परिसरात चिंतन बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांच्याकडे जैन समाजाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची मागणी करण्यात आली.
या बैठकीत जैन समाजाच्या प्रतिनिधींनी मागणी केली की, हे प्रकरण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांच्यासोबत बैठक घ्यावी, जेणेकरून या जमिनीवरील गैरव्यवहाराची वस्तुस्थिती त्यांनाही कळेल. मोठे बिल्डर जाणूनबुजून या जमिनीवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजाच्या धार्मिक स्थळांवर ताबा मिळवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण पंतप्रधानांच्या कळणे अत्यावश्यक आहे.
जैन मुनी गुप्तनंद महाराज म्हणाले की, केवळ जनप्रतिनिधी नव्हे, तर पालक मंत्र्यांनी सर्वप्रथम येथे यायला हवे होते. पण अद्याप त्यांना याबद्दल काही कल्पनाच नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मी त्यांना सुद्धा आवाहन केले आहे, मुख्यमंत्र्यांनाही केले आहे. मुख्यमंत्र्यांमुळेच बहुधा आठ दिवसांचा स्थगिती आदेश मिळाला असावा. मोहोळ यांनी आम्हाला सांगितले आहे की, हा व्यवहार आम्ही रद्द करू आणि समाजाच्या बाजूने उभे राहू. त्यांनी परमेश्सवरामोर हे वचन दिल्याने आम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल. त्यांनी तो तोडू नये, अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही त्यांना ठराविक वेळ देऊ आणि त्या वेळेत त्यांनी काही केले नाही, तर पुढील निवडणुका येतीलच. त्यात जनता पाहून घेईन.
दरम्यान, शिंदे गटाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनीही बोर्डिंगचा जमीन व्यवहार रद्द करण्याची आणि प्रकरणातील आरोपींची कठोर चौकशी करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. धंगेकर यांनी उद्यापासून बेमुदत धरणे करण्याची घोषणाही केली आहे.
पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेवरून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप होत असतानाच बुलढाणा अर्बन बँक आणि भिडेश्वर पतसंस्थेने या जमिनीवर दिलेल्या कर्जासाठी असलेले गहाणखत (रिकन्व्हेन्स डीड) रद्द केले.
हे देखील वाचा –
३० दिवसांत ग्रॅच्युइटी द्या ; अन्यथा आंदोलन करणार ! निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांचा इशारा
एलआयसीवर केंद्राचा दबाव; अदानीत अब्जावधीची गुंतवणूक
कोणाच्याही टेकू शिवाय ठाकरे बंधूंचाच महापौर ! संजय राऊतांचा दावा









