Home / महाराष्ट्र / Amit shah:भाजपाचे चर्चगेटला कार्यालय अमित शहांकडून आज भूमीपूजन

Amit shah:भाजपाचे चर्चगेटला कार्यालय अमित शहांकडून आज भूमीपूजन

Amit shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shah)आज मुंबई दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या...

By: Team Navakal
AMIT SHAHA

Amit shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shah)आज मुंबई दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या दोन अत्याधुनिक खोल समुद्रातील मासेमारी जहाजांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच भाजपा प्रदेश कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजनही केले जाणार आहे.


मुंबईच्या चर्चगेट परिसरात प्रदेश भाजपाचे नव्याने कार्यालय बांधण्यात येणार आहे. या कार्यालयाचे भूमिपूजन दुपारी 12 वाजता शहांच्या हस्ते होईल. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दिल्लीतील राष्ट्रीय कार्यालयाच्या धर्तीवर प्रदेश भाजपाचे हे भव्यदिव्य कार्यालय उभारण्यात येणार आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहा यांचा हा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. अलीकडच्या काळात शहा यांचे मुंबई दौरे वाढले आहेत. महिनाभरापूर्वीच 26 सप्टेंबर रोजी शहा हे मुंबई मुक्कामी आले होते. या दौर्‍यात ते भाजपा आणि महायुतीतील अन्य नेत्यांशी भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे.

—————————————————————————————————————————————————–

हे देखील वाचा –

विमानात मराठी अमराठी वाद पेटला; मुंबईत जाताय मराठी यायलाच हवी..

२७  ऑक्टोबरला उबाठा मेळावा आदित्य बोगस वोटिंग बॉम्ब फोडणार

जैन समाजाचे उद्या देशव्यापी आंदोलन ; नरेंद्र मोदींसोबत बैठकीची मागणी

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या