Ayodhya- दिल्ली जिल्हा न्यायालयाने अॅड. मेहमूद प्राचा यांची सर्वोच्च न्यायालयाचा 2019 मधील अयोध्या (Ayodhya)निकाल रद्द करण्याची याचिका फेटाळली. त्यांना 6 लाख रुपयांचा दंडही ठोठावला. न्यायालयाने नमूद केले की, अशा निरर्थक खटल्यांमुळे न्यायप्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे दंड अनिवार्य आहे. आपल्या याचिकेत प्राचा यांनी दावा केला होता की, माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका भाषणात कबूल केले होते की, अयोध्या निकाल भगवान श्रीरामलल्लाच्या मार्गदर्शनानुसार दिला होता. त्यामुळे त्यांनी या प्रकरणात दिलेला तो निकाल रद्द करावा. यावर जिल्हा न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी स्पष्ट केले की, माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी तसा उल्लेख केवळ आध्यात्मिक दृष्टिकोनातून केला होता. त्याचा कोणताही प्रभाव खटल्यावर पडलेला नाही. प्राचा यांनी दाखल केलेला खटला निरर्थक आणि न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर आहे. प्राचा यांनी देवाकडून मार्गदर्शन मिळवणे याला न्यायालयीन निकालात हस्तक्षेप मानले हे चुकीचे आहे. वैयक्तिक श्रद्धा फसवणूक ठरत नाही. ---------------------------------------------------------------------------------------------------------------
हे देखील वाचा –









