Home / देश-विदेश / Election Commission: निवडणूक आयोग मोठी घोषणा करणार! संपूर्ण देशभरात SIR राबवणार

Election Commission: निवडणूक आयोग मोठी घोषणा करणार! संपूर्ण देशभरात SIR राबवणार

Election Commission: निवडणूक आयोग (Election Commission) देशभरातील अनेक राज्यांसाठी मतदार यादीच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) कार्यक्रमाचे वेळापत्रक आज (27 ऑक्टोबर)...

By: Team Navakal
Election Commission: निवडणूक आयोग मोठी घोषणा करणार! संपूर्ण देशभरात SIR राबवणार

Election Commission: निवडणूक आयोग (Election Commission) देशभरातील अनेक राज्यांसाठी मतदार यादीच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) कार्यक्रमाचे वेळापत्रक आज (27 ऑक्टोबर) जाहीर करणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली संध्याकाळी 4.15 वाजता पत्रकार परिषद होणार आहे.

निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेच्या निमंत्रणात विषयाचा स्पष्ट उल्लेख केला नसला तरी, ही परिषद विशेष पुनरीक्षण वेळापत्रकावरच केंद्रित असण्याची शक्यता आहे.

पहिला टप्पा आणि 2026 मधील निवडणुका

संपूर्ण तपशील अद्याप जाहीर झाला नसला तरी, निवडणूक आयोग SIR चा पहिला टप्पा 10 ते 15 राज्यांमध्ये सुरू करण्याची शक्यता आहे. यामध्ये 2026 मध्ये विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांचा समावेश असेल. तमिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी हे राज्ये/केंद्रशासित प्रदेश पुढील वर्षी मतदानासाठी सज्ज आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असलेल्या किंवा लवकरच येणाऱ्या राज्यांमध्ये हे पुनरीक्षण नंतरच्या टप्प्यांत केले जाईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

पुनरीक्षणाचा उद्देश

या मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेचा मुख्य उद्देश जन्मतारखेची पडताळणी करून बेकायदेशीर परदेशी स्थलांतरितांना ओळखणे आणि त्यांची नावे मतदार यादीतून वगळणे हा आहे.

दरम्यान, या विषयावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. मतदार चोरीच्या आरोपावरून विरोधी पक्ष 1 नोव्हेंबर रोजी मोर्चा काढणार आहेत. यावर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण व्हावे, अशी माझी स्वतःची 2012 पासून मागणी आहे आणि एसआयआर झालेच पाहिजे, या मताचा मी आहे. निवडणूक आयोगाने आता मतदार याद्यांचे पुनरीक्षण करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.”

“पराभवामुळे विरोधकांमध्ये नैराश्य पसरले आहे. त्यामुळे ते असे आंदोलन करतात. विरोधकांची नोटचोरी बंद झाल्यामुळे ते आता व्होटचारीचा (मतदार चोरीचा) आरोप करत आहेत,” अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.

बिहारमध्ये मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम पूर्ण झाले असून, 30 सप्टेंबरपर्यंत जवळपास 7.42 कोटी मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने SIR च्या अंमलबजावणीसाठी राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत दोन बैठका घेतल्या आहेत. माजी मतदारांना ऐतिहासिक रेकॉर्ड्सशी जुळवण्यासाठी, दिल्लीने 2008 तर उत्तराखंडने 2006 मधील जुन्या मतदार याद्या वेबसाइटवर उपलब्ध केल्या आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या