Farmer Loss : यंदा वरून राजाच आगमन लवकर होणार म्हणून या बातमीनेच बळीराजा सुखावला होता. मात्र स्वागतासाठी पायघड्या अंथरलेल्या बळीराजाच्या (Farmer Loss)डोळ्यात मात्र हतबलतेचा पूर पाहायला मिळाला. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. मान्सून (heavy rain) परातल्यानंतरही आता अवकाळी पावसाचा तडाखा काही थांबत नाही आहे.
कांद्याचं उत्पन्न घेणाऱ्या नाशिकच्या लासल गावातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अवकाळीचा तडाख्यामुळे अश्रूंचा पूर आलाय. यावर काही शेतकऱ्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली. कांदा ५०% वरती खराब होतोय, आणि बाजरात भाव देखील नाही. अश्या दुहेरी संकटाना त्यांना सामोरे जावे लागत आहे. काही शेतकऱ्यांनी सरकारला विनंती केली काही दिवसांपूर्वी गुजरात सरकारने ज्या प्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आणि त्यासाठी काही अनुदान देखील जाहीर केलं होत, साठवून ठेवलेल्या कांद्याला अनुदान जाहीर करावं अशी विनंती देखील एका बळीराज्याने केली आहे. काल रात्र भर पावसाची रीप रीप हि सुरूच होती,त्यामुळे लागवड केलेल्या कांद्याचे नुकसान झाले. १ एकरात जगणं मुश्किल आहे. तुटपुंजा मदतीने शेतकऱ्याचं काही होणार नाही तो खर्च लागवडीपुरताच सीमित असतो. या अस्मानी संकटामुळे कांदा वाचन सोप्प नाही. अशी शोकांतिका एक बळीराजाने माध्यमांसमोर व्यक्त केली.

मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्यापैकी निम्याहुनही अधिक सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने बळीराजाच्या हात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. तर दुसरीकडे चांगला दार मिळेल या आशेवर राखून ठेवलेला कांदा मात्र आता साडू लागलाय. त्यात देखील प्रति क्विंटल ८०० ते १००० रुपये हा दर जखमेवर चांगलंच मीठ चोळतोय. द्राक्ष पांढरी अशी हि नाशिकची दुसरी ओळख सांगितली जाते. मात्र अवकाळीने द्राक्ष भागातदेखील मोठा तडाखा दिलाय. याने बळीराजा मात्र आतून पोखरून गेला आहे. हतबलच्या वाटेवर चालणाऱ्या या बलिराज्यची व्यथा त्याच्या अश्रुंमधून कळते. या तडाख्यातून बळीराजा कसा बसा सावरत असतानाच पिकांना लागलेल्या किडीमुळे उत्पन्नात आणखीन घट होण्याची भीती त्याला सतावते आहे.
कांदा आणि द्राक्षांप्रमानेच बगलांन आणि मालेगावसह इतर भंगांमध्ये मका वाल आणि टोमॅटोचं मोठं नुकसान झालेलं आहे. या अवकाळी पावसामुळे कापसाला देखील याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. मोठ्या कष्टाने कमावलेली शिदोरी आणि कष्ट घेऊन पिकवलेला कापूस भिजून खराब झालाय. त्यात या महिना अखेर पर्यंत पाऊस पडण्याच्या बातमीने बळीराज्याची चिंता वाढली आहे.

काढणीला आलेल्या सोयाबीनमुळे अतिवृष्टीत आधीच मान टाकली होती. त्यामुळे कापसाकडून थोडी फार आशा या शेतकऱ्यांना होती, मात्र त्या आशेवर सुद्धा पावसाने पाणी फेरल. त्यामुळे आता दोन वेळच्या जेवणासाठी आता चूल कशी पेटवायची हि चिंता त्यांना सतावू लागली आहे. नागपूर आणि अमरावतीवर सुद्धा निसर्ग कोपला आहे. संत्राभागांमध्ये सुद्धा फळ गळ सुरु झाली आहे. यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. दिवाळीच्या सुमारास यंदाही बहुतांश धान्य पिकांची कंपनी झाली, त्याची मळणी करून घरी न्यायची लगबग सुरूच होती. नेमकी त्याच वेळी पावसाने हजेरी लावली, आणि बळीराज्याच्या पदरी निराशा आणि चिंता आली.
पालघरच्या आदीवासी बहुल भागात अनेक कुटुंब पावसाळी भात शेतीवर अवलंबून असतात वर्षभराची बेगमी असलेल्या भात कंपनीला सुरवात होणारच होती तितक्यात पावसाने हजेरी लावली. आता वर्ष भर पोटासाठी काय करायचं असा प्रश्न आता शेकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी घोषणा तर अनेक झाल्या. पण तरीही पदरात फारसे काही पडले नाही. राज्य सरकारने नुकसानभरपाई म्हणून शेतकऱ्यांना द्यायच्या मदतीचे जूनपासून चार अध्यादेश देखील काढले. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील नुकसानासाठी अनुक्रमे १४१८ कोटी, ६५ कोटी, १३५३ कोटी आणि ३४६ कोटी, असे १५ दिवसांत ३१८२ कोटींच्या मदतीचे सर्वात मोठे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले. पण खरच हि मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फक्त ८५१ लाभार्थींना साधारण ५३ लाखांचे एवढेचअनुदान मिळाले. ई-केवायसीमुळे प्रलंबित शेतकऱ्यांची संख्या २१७२ असून, त्यांना मिळणारी रक्कम ८८ लाख एवढी आहे. जिल्ह्यात अधिकतर ६ लाख ९ हजार हेक्टरवरील नुकसान ऑक्टोबर महिन्यात झाले. या शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. याकरिता ५६९ कोटी रुपये मंजूर देखील करण्यात आले. मात्र, दिवाळीपूर्वी हे अनुदान देण्याचे वचन सरकारने पाळले नसल्याचे आत शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा न झालेले शेतकरी या संधर्भात रोष व्यक्त करताना दिसत आहेत. कमी-अधिक प्रमाणात सर्वच जिल्ह्यांतील स्थिती एकसारखीच. २१ लाख शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा आकडा मात्र सरकार कौतुकाने सांगते; पण १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले आहेत त्याच काय ? त्यांना ११३९ कोटी कधी मिळणार, हे सांगण्याचे धाडस सरकार दाखवत आहे का?

दिवाळीपूर्वी रक्कम खात्यात जमा होईल, ही सरकारची घोषणा फटाक्यांच्या धुरासारखी हवेतच विरली. मदत आज येईल, उद्या येईल या आशेवरच दिवाळी निघूनसुद्धा गेली. आता पुढे काय? रब्बीची लागवड कशी करायची, मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा, लग्न-कार्यासाठी पैसा कुठून आणायचा? या चिंतेत बळीराजा मात्र अडकला आहे. मदत कधी येईल आणि मराठवाड्यातील बळीराजाला दिलासा कधी मिळेल? त्यामुळे पावसाचं हे संकट शेतकऱयांच्या संयमाची परीक्षा पाहताना दिसत आहे.
हे देखील वाचा – Doctor suicide- फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी वॉशिंग मशीन फिरले! निंबाळकर निर्दोष









