Home / क्रीडा / Shreyas Iyer : अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने श्रेयस अय्यर आयसीयूमध्ये दाखल?

Shreyas Iyer : अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने श्रेयस अय्यर आयसीयूमध्ये दाखल?

Shreyas Iyer : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरच्या बरगड्यांना झालेल्या दुखापतीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यानंतर भारताचा एकदिवसीय उपकर्णधार श्रेयस अय्यरला सिडनी...

By: Team Navakal
Shreyas Iyer

Shreyas Iyer : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरच्या बरगड्यांना झालेल्या दुखापतीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यानंतर भारताचा एकदिवसीय उपकर्णधार श्रेयस अय्यरला सिडनी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि सध्या तो अतिदक्षता विभागात असल्याचे देखील बोलले जाते आहे (ICU) आहे.

अय्यर, ज्याने बॅकवर्ड पॉइंटवरून मागे धावत अ‍ॅलेक्स कॅरीला बाद करताना एक शानदार कॅच घेतला होता, त्याच्या डाव्या बाजूच्या बारगड्याना दुखापत झाल्याचे दिसून आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अय्यर ड्रेसिंग रूममध्ये बेशुद्ध पडला आणि त्याचे जीवनमान चिंताजनकपणे कमी झाले. त्याला लवकरच रुग्णालयात नेण्यात आले.

श्रेयस अय्यरच्या डाव्या बरगड्यांना खालच्या भागात दुखापत झाली आहे. त्याला अधिक तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. अधिक टेस्ट करताना दुखापत झाल्याचे दिसून आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत, तो वैद्यकीयदृष्ट्या स्थिर आहे आणि तो बरा होत आहे,” असे बीसीसीआयने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे.

“सिडनी तसेच भारतातील तज्ञांशी सल्लामसलत करून बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्या दुखापतीच्या स्थितीवर बारकाईने लक्ष केंद्रित करून आहे. भारतीय संघाचे डॉक्टर श्रेयससोबत सिडनीमध्येच राहून त्याच्या दैनंदिन प्रगतीचे मूल्यांकन करतील,” असे या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, या मालिकेत भारतीय संघाला दुखापतींचा फटका बसला आहे. कर्णधार शुभमन गिल यांनी नाणेफेकीदरम्यान सांगितले होते की, नितीश कुमार रेड्डी (मांडीच्या स्नायूंची दुखापत) आणि अर्शदीप सिंह (स्नायू ताण) यांनाही दुखापत झाल्याने ते खेळात सहभागी होऊ शकले नाहीत.


हे देखील वाचा – Nashik Crime : नाशिकच्या कारागृहात कैद्याची आत्महत्या; आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट..

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या