Home / News / Panna’s Diamond Turns Out to Be Stone : १०० कोटींचा हिरा नाही, तो तर एक साधा दगडच! पन्नाच्या दगडाची तपासणी

Panna’s Diamond Turns Out to Be Stone : १०० कोटींचा हिरा नाही, तो तर एक साधा दगडच! पन्नाच्या दगडाची तपासणी

Panna’s Diamond Turns Out to Be Stone – पन्ना येथील हिरा कार्यालयात एक चमकदार दगड तपासणीसाठी आला. तो निव्वळ चमकदार...

By: Team Navakal
Panna's Diamond Turns Out to Be Stone

Panna’s Diamond Turns Out to Be Stone – पन्ना येथील हिरा कार्यालयात एक चमकदार दगड तपासणीसाठी आला. तो निव्वळ चमकदार दगड नाही, तर तब्बल १०० कोटींहून अधिक किंमतीचा हिरा असल्याचा दावा केला जात असल्याने त्याची तपासणी करण्यात आली, तेव्हा ते प्रत्यक्षात एक सामान्य चमकणारे खनिज (क्वार्ट्झ) असल्याचे सिद्ध झाले.

पन्ना येथील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दयारामने एक चमकदार दगड आपल्या भागीदारांपासून (जय बहादूर सिंग) लपवून ठेवल्यामुळे वाद निर्माण झाला होता. तो एक मौल्यवान हिरा आहे, असे समजून त्याने हा दगड लपवून ठेवला होता. या वादाचे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आणि त्यानंतर हा दगड तपासणीसाठी पाठवण्यात आला.

पन्ना हिरा कार्यालयातील हिरा परीक्षक अनुपम सिंग यांनी सांगितले की, जर हा खरा हिरा असता तर त्याचे अंदाजित मूल्य १०० कोटी रुपये पेक्षा अधिक असते. पण सखोल तपासणीनंतर, हा एक साधा चमकणारा दगड असल्याचे आढळले. त्यामुळे १३७.१४ कॅरेट वजनाच्या या दगडाला कसलेही मूल्य नाही.

दरम्यान, पोलिसांनी हा दगड लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दयारामला त्याच्या एका नातेवाईकाकडून दगड हस्तगत केल्यानंतर पकडले होते. आता हा दगड पुढील कार्यवाहीसाठी कोतवाली पोलिसांकडे सोपवण्यात येणार आहे.


हे देखील वाचा – 

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे ५३ वे सरन्यायाधीश होणार; सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांनी केली शिफारस

सदा सरवणकरांची थोरली सून आहे मराठमोळी अभिनेत्री..

 भटक्या कुत्र्यांचा खटला; सर्वोच्च न्यायालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना फटकारले..

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या