Home / महाराष्ट्र / Sushama andhare:डॉ. संपदा मुंडेंची हत्या? आत्महत्या नाही! निंबाळकरांचा संबंध ! अंधारेंचा आरोप

Sushama andhare:डॉ. संपदा मुंडेंची हत्या? आत्महत्या नाही! निंबाळकरांचा संबंध ! अंधारेंचा आरोप

Sushama andhare- फलटणमधील डॉ. संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. ती आत्महत्या नाही तर हत्या...

By: Team Navakal
sushama andhare

 Sushama andhare- फलटणमधील डॉ. संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. ती आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा गंभीर आरोप उबाठा नेत्या सुषमा अंधारे (Sushama andhare)यांनी केला. त्यांनी पत्रकार परिषदेत माजी खा. आणि भाजपा नेते रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावा केला. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिलेल्या क्लीनचिटवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याशिवाय त्यांनी निंबाळकर यांच्याशी संबंधित ननावरे दाम्पत्याची आत्महत्या आणि दिगंबर आगवणे यांच्या कुटुंबावर दाखल गुन्हे याबाबतही मांडणी केली. यावेळी दिगंबर आगवणे यांच्या पत्नी जयश्री आगवणे आणि मोठी मुलगी वर्षा उपस्थित होत्या. त्यांनीही अंधारे यांच्या आरोपांना दुजोरा दिला.


उबाठा नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, काल फलटणमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. संपदा मुंडे मृत्यू प्रकरणात भाजपाचे माजी खा. रणजीतसिंह नाईक – निंबाळकर यांना क्लीनचिट दिली. मुख्यमंत्र्यांनी ही क्लीनचिट कोणत्या आधारावर दिली? मुख्यमंत्र्यांनी भाषणात  सांगितले की, निंबाळकर जर दोषी असते तर मी त्यांना सोडले नसते. त्यांनी क्लीनचिट देण्याची घाई करू नये.
डॉ. संपदा मुंडेंनी हातावर लिहिलेली सुसाईड नोट आणि चौकशीच्या अनुषंगाने तिने लिहिलेले पत्र व्हायरल झाले. संपदाच्या बहिणीने सांगितले की, हातावरील नोट आणि पत्रातील हस्ताक्षरात फरक आहे. हातावरील हस्ताक्षर संपदाचे नाही. या प्रकरणात गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांची नावे आरोपी म्हणून पुढे आली. दोन्ही आरोपी हजर झाले. दोघेही ज्या प्रकारे हजर झाले ते आम्हाला संशयास्पद वाटते. मृत्यूनंतर तिचे चारित्र्यहनन केले जात आहे. चार पानी चिठ्ठीत संपदा मुंडे यांनी लिहिले की,माझ्यावर प्रचंड दबाव येत होता. मला काही लोकांना फिजिकली फिट असल्याचे सांगायला सांगितले होते. बीड हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. येथून राज्यातील अनेक कारखान्यांत कामगार पोहोचतात. रणजीतसिंह नाईक – निंबाळकर यांच्या उपलावे येथील कारखान्यावरही मजूर जातात. काही ठिकाणी ऊसतोड मजूर हे मुकादमाकडून उचल म्हणून आगाऊ रक्कम घेतात. हे मजूर काही वेळा निघून जातात किंवा कामावर थांबत नाही. अशा वेळी त्यांच्याकडून पैसे वसुली करण्यासाठी अमानुष पद्धती वापरल्या जातात. रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांनी असंख्य मजुरांना मानसिक त्रास दिला, त्यांना उचलून आणले, त्यांना मारहाण झाली, त्यांना इजा केली. ते मजूर उचलून आणायचे, त्यांना बेदम मारहाण करायचे आणि त्यांच्या विरुद्ध तेच पोलीस तक्रार दाखल करायचे. परंतु त्यांच्यावर गुन्हा नोंद होऊ नये यासाठी संबंधित व्यक्ती फिट असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यासाठी त्यांना सरकारी रुग्णालयात नेले जायचे. त्याठिकाणी डॉक्टरवर फिट असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी दबाव टाकायचा. ज्यावेळी संपदा मुंडे यांनी फिजिकली अनफिट असल्याचे सांगितले तेव्हा निंबाळकर आणि त्यांचे लोक म्हणाले की, तुम्ही बीडचे आहात म्हणून तुम्ही वाचवत आहात का?  


2022 पासून निंबाळकर यांनी पोलिसांना हाताशी धरून मजुरांच्या विरोधात 277 तक्रारी केल्या आहेत. एका दिवशी 14 एफआयआर दाखल झाल्याची नोंद आहे. राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज  उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी रुग्णालयाला भेट देऊन चौकशी केली. त्यांनी माहिती दिली की, या प्रकरणात डॉक्टर आणि आरोपी गोपाळ बदने यांच्यात जानेवारी ते मार्चदरम्यान संपर्क होता. मात्र त्यानंतर कोणतेही संभाषण झाले नव्हते. तर आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा आरोपी प्रशांत बनकरसोबत फोटोवरून वाद झाला होता. त्यानंतर त्या हॉटेलला राहायला गेल्या. रात्री त्यांनी बनकर यांना अनेक संदेश पाठवले, आत्महत्येची धमकीही दिली. पण बनकर यांचा फोन बंद होता. डॉक्टरांनी आयसी समितीकडे कोणतीही तक्रार केली नव्हती. चौकशी समितीच्या अहवालानुसार, डॉक्टर आणि पोलिसांमध्ये वाद होत असल्याने रात्रीच्या ड्युटीवरून त्यांची बदली करावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. त्या मुद्दाम आरोपींना अनफिट ठरवतात, अशीही त्यांच्या विरोधात लेखी तक्रार आहे. प्राथमिक अहवालानुसार हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे समजते. मात्र, डॉक्टरने बदनेवर बलात्काराचे आरोप केल्यामुळे, दोघांचे लोकेशन तपासले जात आहे. या प्रकरणाचा तपास पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. दोन्ही आरोपींना अटक केली  आहे.

——————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा – 

 मुंबई मेट्रो ३ मार्गावर सामानाची ने-आण करताना प्रवाशांची दमछाक

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे ५३ वे सरन्यायाधीश होणार; सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांनी केली शिफारस

१०० कोटींचा हिरा नाही, तो तर एक साधा दगडच! पन्नाच्या दगडाची तपासणी

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या