Home / देश-विदेश / Green Card: अमेरिकेत ग्रीन कार्ड धारकांसह परदेशी नागरिकांसाठी नवीन नियम लागू; भारतीयांवर काय परिणाम होणार?

Green Card: अमेरिकेत ग्रीन कार्ड धारकांसह परदेशी नागरिकांसाठी नवीन नियम लागू; भारतीयांवर काय परिणाम होणार?

US Green Card Rules: अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागाने नवीन सीमा नियमावली जाहीर केली आहे, त्यानुसार ग्रीन कार्ड धारकांसह सर्व बिगर-अमेरिकन...

By: Team Navakal
Green Card: अमेरिकेत ग्रीन कार्ड धारकांसह परदेशी नागरिकांसाठी नियम लागू; भारतीयांवर काय परिणाम होणार?

US Green Card Rules: अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागाने नवीन सीमा नियमावली जाहीर केली आहे, त्यानुसार ग्रीन कार्ड धारकांसह सर्व बिगर-अमेरिकन नागरिकांना देशात प्रवेश करताना आणि देश सोडताना छायाचित्रे देणे अनिवार्य करण्यात आले आहे.

राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि बनावट प्रवास कागदपत्रांचा वापर रोखण्यासाठी अमेरिकेची सीमा शुल्क आणि सीमा संरक्षण यंत्रणा जमीन, समुद्र आणि विमानतळांवर बायोमेट्रिक डेटा संकलित करेल. ग्रीन कार्ड धारकांमध्ये भारतीयांची संख्या जास्त आहे, त्यामुळे नियमांचा परिणाम त्यांच्यावर देखील होणार आहे.

नियम कधीपासून लागू?

डिसेंबर 26, 2025 पासून हे नवीन नियम लागू होतील, अशी माहिती राष्ट्रीय सुरक्षा विभागाने दिली आहे.

या नवीन प्रणालीअंतर्गत, सीमा शुल्क अधिकारी अमेरिकेत येणाऱ्या किंवा येथून जाणाऱ्या जवळपास सर्व गैर-नागरिकांचे फोटो आणि इतर बायोमेट्रिक माहिती गोळा करतील. पूर्वी 14 वर्षांखालील आणि 79 वर्षांवरील प्रवाशांना या नियमांमधून सूट देण्यात आली होती, ती आता काढून टाकण्यात आली आहे. याचा अर्थ आता या वयोगटातील लोकांनाही बायोमेट्रिक माहिती देणे बंधनकारक असेल.

सीमा शुल्क यंत्रणा आधीच अनेक प्रमुख अमेरिकन विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमानांमधून येणाऱ्या प्रवाशांची पडताळणी करण्यासाठी चेहरा ओळख तंत्रज्ञानाचा वापर करते. पण, या नवीन नियमांमुळे सर्व प्रवेश बिंदूंवर ही प्रक्रिया अनिवार्य होईल. ओळख फसवणूक शोधणे, व्हिसा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवणे आणि सीमा सुरक्षा मजबूत करणे, हे या विस्ताराचे उद्दिष्ट असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सीमा शुल्क यंत्रणेने अंदाज व्यक्त केला आहे की, पुढील 3 ते 5 वर्षांत सर्व व्यावसायिक विमानतळ आणि बंदरांवर प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या दोन्ही ठिकाणी बायोमेट्रिक एंट्री-एक्झिट प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित केली जाऊ शकते.

गोपनीयता आणि अचूकतेवर प्रश्नचिन्ह

या बायोमेट्रिक प्रणालीच्या विस्तारामुळे गोपनीयतेबद्दल आणि अचूकतेबद्दल चिंता व्यक्त होत आहेत.

अमेरिकेच्या नागरी हक्क आयोगाच्या 2024 च्या एका अहवालात, चेहरा ओळख प्रणाली आफ्रिकन वंशाचे लोक आणि इतर अल्पसंख्याक गटांना ओळखण्यात जास्त चुका करते, ज्यामुळे नागरी हक्कांचे प्रश्न अधिक वाढू शकतात, असे नमूद केले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या