Home / देश-विदेश / Meta is Firing 600 Employees : एआय नोकऱ्यादेखील धोक्यात?६०० कर्मचाऱ्यांना मेटाने दिला नारळ!

Meta is Firing 600 Employees : एआय नोकऱ्यादेखील धोक्यात?६०० कर्मचाऱ्यांना मेटाने दिला नारळ!

Meta is Firing 600 Employees : आधुनिक दुनियेत आता सगळ्यात जास्त चालणारी गोष्टी म्हणजे एआय(AI). काही दिवसांपासून एआय प्रचंड चर्चेत...

By: Team Navakal
Meta is Firing 600 Employees

Meta is Firing 600 Employees : आधुनिक दुनियेत आता सगळ्यात जास्त चालणारी गोष्टी म्हणजे एआय(AI). काही दिवसांपासून एआय प्रचंड चर्चेत आहेत. सार्वधिक जास्त पगाराची नोकरी म्हणून या क्षेत्राकडे पाहिलं जात. त्यामुळे इथल्या नोकऱ्या जास्त सुरक्षित आहेत असा गोड समज काहींना झाला होता. पण त्यांच्या या गैरसमजच फुगा लवकरच फुटणार आहे. कारण दिग्गज कंपनी मेटाने आपल्या एआय विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून चक्क काढून टाकल्याची बातमी आहे.

फेसबुकची मूळ कंपनी मेटाने एआय सारख्या सुपरइंटेलिजन्स प्रकल्पासाठी एक मोठी टीम तयार केली होती. त्यासाठी अब्जावधी डॉलर्सही देखील खर्च करण्यात आले होते. मात्र, आता याच विभागातील तब्बल ६०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता एआय नोकऱ्याही सुरक्षित नाहीत का? असे प्रश्न आताच्या युवकांनसमोर उभे ठाकले आहेत. नोकर कपात करण्यात आल्याची माहिती मुख्य एआय अधिकाऱ्यांनी एका अंतर्गत मेमोअंतर्गत दिली आहे.

६०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्याचे कारण नेमके कारण काय?
फेसबुकच्या मूळ कंपनीन मेटा त्यांच्या ‘सुपरइंटेलिजन्स लॅब्स’ विभागातील तब्बल ६०० कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य एआय अधिकाऱ्यांनी एका मेमोमध्ये दिली आहे.अलेक्झांडर वांग यांनी या बद्दल अधिक माहिती दिली आहे. या कपातीमुळे कंपनीला अधिक जलद गतीने निर्णय घेण्यास मदत होईल, असे काही वृत्तांमध्ये दिले आहे. वांग यांनी अंतर्गत मेमोमध्ये लिहिले आहे की, “आमच्या टीममधील सदस्य संख्या कमी केल्याने निर्णय घेण्यासाठी कमी चर्चा कराव्या लागणार आहेत. प्रत्येक व्यक्ती अधिक जबाबदारी उचलेल, तसेच त्यांची कामाची व्याप्ती आणि प्रभाव देखील वाढेल.”पुढे ते म्हणतात “आम्ही उद्योगातील सर्वात प्रतिभावान टीम तयार करण्याच्या दिशेने पाऊल उचलत आहोत. ‘एमएसएल’ (MSL – Meta Superintelligence Labs) मध्ये काही बदल केले गेले आहेत. आमच्या टीमची संख्या कमी केल्यामुळे प्रत्येक व्यक्ती अधिक जबाबदारीने काम करणार आहे. आपल्या सहकाऱ्यांना निरोप देण हा कधीच सोपा निर्णय नसतो. ही सर्वजण अत्यंत प्रतिभावान आहेत, त्यांनी देखील कंपनीच्या एआय प्रकल्पामध्ये खूप मेहनत घेतली आणि मोलाचे योगदान दिले आहे.

ते पुढे म्हणतात प्रभावित कर्मचाऱ्यांना याची सूचना देण्यात आली आहे. या मेमोशिवाय मेटाकडून कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही. काही महिन्यांपूर्वीच मेटाने ओपनएआय (OpenAI), गुगल डीपमाईंड (Google DeepMind), ॲपल (Apple) आणि इतर कंपन्यांमधील अभियंते (Engineers) आणि संशोधकांना (Researchers) कामावर घेण्यासाठी लाखो डॉलर्स खर्च केले होते अशी माहिती आहे. मात्र, आता याच कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचा मोठा निर्णय कंपनीने घेतला आहे.

यापैकी बहुतांश प्रभावित कर्मचाऱ्यांना कंपनीमध्ये नवीन काम शोधून देणयासाठी आम्ही मदत करत आहोत. त्यांच्या कौशल्याशी जुळणारे काम शोधण्यासाठी शिवाय जलद भरती प्रक्रियेद्वारे त्यांना कामावर रुजू करण्यासाठी, आम्ही भरती करणाऱ्यांच्या ‘टायगर टीम’ची स्थापना केली आहे, असे देखील ते म्हणाले.

काही वृत्तांमध्ये याबाबत अधिक सांगण्यात आले आहे. २१ नोव्हेंबरपर्यंत ‘नॉन-वर्किंग नोटिस पीरियड’मध्ये कर्मचारी असतील आणि या वेळेचा उपयोग ते मेटा मध्ये दुसरी भूमिका शोधण्यासाठी देखील करू शकतात. जर त्यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला, तर त्यांना सेव्हरन्स पॅकेज सुद्धा स्वीकारता येणार आहे, ज्यात किमान १६ आठवड्यांचा पगार त्यांना मिळणार असलयाचे काही वृत्तांमध्ये लिहले आहे.

प्रभावित कर्मचाऱ्यांना मात्र या निर्णयाने धक्का बसला आहे. पण मेमोनुसार, त्यांना १६ आठवड्यांचे सेव्हरन्स आणि कंपनीत पूर्ण केलेल्या प्रत्येक वर्षासाठी अतिरिक्त दोन आठवड्यांचा पगार दिला जाणार असल्याचे सांगितले आहे. असे असले तरी कंपनीने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे. ६०० हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर मात्र संतापाची लाट पसरलीं आहे.

यावर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील नोकऱ्याही सुरक्षित राहिलेल्या नाहीत. जुन्या कर्मचाऱ्यांना लक्ष्य यात लक्ष केलं आहे. नोकर कपातीच्या या बातमीने नोकरीच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं दिसत आहे. सोशल मीडियावर लोक कंमेंट करत म्हणतात “कल्पना करा की तुम्ही अनेक वर्षांपासून मेटामध्ये काही लाख डॉलर्ससाठी काम करत आहात आणि अचानक तुम्हाला समजत कि तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले.” आणि “या अब्जाधीशाला विसर पडला आहे की लोक अन्नासाठी नोकरीवर अवलंबून असतात. असं म्हणतात नेटकाऱ्यानी यावर आपला संताप व्यक्त केला आहे.


हे देखील वाचा – Oats Health Benefits: एक महिना रोज ओट्स खाल्ल्यास शरीरात होतात ‘हे’ 7 मोठे बदल

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या