Health Benefits Of Eating Curd Daily : रोग्यासंदर्भातील वाढती जागरूकता वेगवेळ्या गोष्टी आहारात समाविष्ट करतात. तसेच दही हे भारतीयांच्या आहारातील महत्त्वपूर्ण भाग आहे. प्रोबायोटिक्सचा उत्तम साठा असलेले दही आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी अतिशय उपयोगी मानले जाते, यामुळे पचनप्रक्रिया सुधारते आणि शरीराची रोगप्रतिकारकशक्ती अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. दह्यातील चांगल्या बॅक्टेरियांमुळे आतड्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त दह्यामध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन बी १२, प्रोटीन यासारखे पोषणतत्त्वही अधिक प्रमाणात आहेत; ज्याद्वारे शरीराची हाडे मजबूत राहण्यासह शरीरातील ऊर्जाही टिकून राहण्यास मदत मिळते.
नियमित दह्याचे सेवन करणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यातील पोषणतत्त्व शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास अधिक मदत करतात, यामुळे हृदयविकारांचा धोका देखील कमी होतो. शिवाय दह्यातील पोटॅशिअममुळे रक्तदाबाची पातळीही नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

दह्यातील प्रोबायोटिक्समुळे पोट शांत राहते. यातील चांगल्या बॅक्टेरियांमुळे पोटातील हानिकारक बॅक्टेरियांचा खात्मा होऊन पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते. पोटातील गॅस, पोट फुगणे, आतड्यांशी संबंधित समस्यांपासून देखील सुटका मिळते.
दह्यातील कॅल्शिअम शरीरातील कॉर्टिसोल नावाचे स्ट्रेस हार्मोनचा स्त्राव नियंत्रणात ठेवण्याचे काम करतो. या हार्मोनमुळे पोटाच्या भागाजवळ कमी अधीक प्रमाणात चरबी जमा होऊ लागते. नियमित एक वाटी दही खाल्ल्यास कॉर्टिसोल हार्मोनची पातळी कमी होण्यासह पोटावरील चरबी कमी होण्यास मदत मिळते.
दह्यातील पोषणतत्त्वांमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती हि अधिक मजबूत होते. यातील चांगल्या बॅक्टेरियांमुळे शरीराला संसर्गांविरोधात लढण्यास मोठी मदत मिळते. पण मर्यादित स्वरुपातच दह्याचे सेवन करावे. कॅल्शिअम आणि फॉस्फरसचे उत्तम स्त्रोत म्हणजे दही आहे. दह्यातील खनिजांमुळे शरीराची हाडे आणि दात मजबूत राहण्यास मदत होते.
हे देखील वाचा – Gold Silver Rate Update : मागच्या २४ तास सोन्याच्या दरात मोठी घसरण..









