Home / महाराष्ट्र / Heena Gavit : हिना गावितांची पुन्हा एकदा भाजपात घरवापसी…

Heena Gavit : हिना गावितांची पुन्हा एकदा भाजपात घरवापसी…

Heena Gavit : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन भाजपकडून (BJP) पुन्हा एकदा ‘ऑपरेशन लोटस’ सक्रिय होताना दिसत आहे....

By: Team Navakal
Heena Gavit

Heena Gavit : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन भाजपकडून (BJP) पुन्हा एकदा ‘ऑपरेशन लोटस’ सक्रिय होताना दिसत आहे. राज्यभरात बंडखोर आणि नाराज नेत्यांना पुन्हा पक्षात सामावून घेण्याचे सत्र सुरू असतानाच आता नंदुरबारमध्येही भाजपची ताकद वाढणार असलयाचे दिसून येत आहे. माजी खासदार डॉ. हिना गावित (Heena Gavit) यांचा आज भाजपमध्ये पुन्हा प्रवेश झाला आहे. त्यांच्या या ‘घरवापसी’मुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने डॉ. हिना गावित यांनी पक्षाचा राजीनामा देऊन अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून त्या उभ्या राहिल्या. त्या वेळी त्यांनी सांगितले होते, “मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे, त्यामुळे पक्षाला अडचण येऊ नये म्हणून राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. पुढे त्या असहि म्हणतात मी खासदार असताना या भागात अनेक विकासकामे केली असून मतदार त्याचा प्रतिसाद नक्की देतील,” असे देखील त्यांनी म्हटले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने भाजपने पुन्हा एकदा डॉ. हिना गावित यांच्यासाठी पक्षाची दारे खुली केल्याचे दिसून आले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह त्यांनी पुन्हा एकदा भाजपचा झेंडा हाती घेतला. या प्रवेशामुळे नंदुरबार जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढेल, असा विश्वास देखील भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.

डॉ. हिना गावित या माजी आदिवासी विकास मंत्री होत्या तसेच विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत. गावित कुटुंबाचे उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी पट्ट्यात मोठे राजकीय वजन देखील आहे. त्यामुळे हिना गावित यांच्या पुनरागमनामुळे भाजपला नंदुरबार आणि आसपासच्या जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठा फायदा होणार असल्याच्या चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत.

२०२४च्या लोकसभा निवडणुकीत नंदुरबार मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी हिना गावित यांचा १,५९,१२० मतांनी पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी स्थानिक पातळीवर स्वतंत्रपणे जनसंपर्क वाढवून राजकीय पायाभरणी सुरूच होती. आता, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या प्रशवभूमीवर
तसेच गावित कुटुंबाचे आदिवासी समाजातील प्रभाव लक्षात घेता, भाजपने त्यांच्यासाठी पुन्हा पक्षाचे दारे खुली केली असल्याचे मानले जात आहे.


हे देखील वाचा – Gold Silver Rate Update : मागच्या २४ तास सोन्याच्या दरात मोठी घसरण..

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या