iPhone 16 Pro Discount : नवीनतम आयफोन 17 (iPhone 17) सीरिज लॉन्च होऊनही, मागील वर्षीचा प्रीमियम फ्लॅगशिप फोन iPhone 16 Pro सध्या बाजारात धुमाकूळ घालत आहे. विशेषतः, एका मोठ्या ई-कॉमर्स ॲपने या फोनवर दिलेला डिस्काउंट पाहून ग्राहक आश्चर्यचकित झाले आहेत.
जर तुम्ही iPhone 16 Pro खरेदी करण्याची योजना आखत असाल, तर 19,910 रुपयांची मोठी बचत करण्याची संधी आता उपलब्ध आहे. ही धमाकेदार डील नेमकी कुठे आणि किती किमतीत मिळत आहे, ते पाहूया.
iPhone 16 Pro Discount : ऑफर कुठे आहे?
ही खास ऑफर ॲमेझॉन वर नाही किंवा फ्लिपकार्ट वर नाही, तर बिग बास्केट या ॲपवर iPhone 16 Pro वर मोठा डिस्काउंट मिळत आहे. बाजारात 1,19,900 रुपये किंमत असलेला हा फोन आता बिग बास्केटवर 99,990 रुपयांना उपलब्ध आहे. याचा अर्थ, ग्राहकांची थेट 20,000 रुपयांची बचत होत आहे.
सर्वात विशेष म्हणजे, बिग बास्केट काही विशिष्ट ठिकाणी हा फोन केवळ 20 मिनिटांत डिलिव्हरी करत आहे. या ऑफरसोबतच तुम्हाला निवडक क्रेडिट कार्ड्सवर बँक डिस्काउंट देखील मिळू शकतो. तसेच, तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंजमध्ये देऊन अतिरिक्त सवलत मिळवू शकता, जी तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल.
iPhone 16 Pro ची वैशिष्ट्ये:
ॲपलने 2024 मध्ये iPhone 16 Pro लाँच केला होता. यात पॉवरफुल A18 Pro चिप आहे, ज्यात 6-कोर CPU (2 परफॉर्मेंस + 4 एफिशियंसी कोर), 6-कोर GPU आणि 16-कोर न्यूरल इंजिन समाविष्ट आहे. ही चिप AI आधारित कामे अधिक जलद आणि सुरळीत करते.
या फोनमध्ये 6.3 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह उत्कृष्ट व्हिज्युअल अनुभव देतो.
कॅमेरा क्वालिटीबद्दल बोलायचं झाल्यास, iPhone 16 Pro मध्ये 8 मेगापिक्सलचा मेन लेन्स, 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड लेन्स, आणि 5x ऑप्टिकल टेलीफोटो लेन्स दिला गेला आहे.
समोरच्या बाजूला 12 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे, जो f/1.9 अपर्चर आणि ऑटोफोकससह येतो. यामुळे फोटो आणि व्हिडिओ दोन्ही उत्कृष्ट डिटेल्स आणि नैसर्गिक रंगांसह येतात.









