UAE Lottery Winner: एखाद्या व्यक्तीचे नशीब कधी व कशामुळे बदलेल हे सांगता येत नाही. एका व्यक्तीचे नशीब चक्क आईच्या जन्मतारखेमुळे बदलले आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये राहणाऱ्या एका 29 वर्षीय भारतीय तरुणाने लॉटरी (Lottery) इतिहासातील पहिला 100 दशलक्ष दिर्हामचा (240 कोटी रुपये) जॅकपॉट जिंकून नवा विक्रम केला आहे. अनिलकुमार बोल्ला नावाच्या या तरुणाने 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या लकी डे ड्रॉमध्ये हे मोठे बक्षीस मिळवले.
UAE लॉटरीने विजेत्याची मुलाखत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. “उत्सुकतेपासून ते जल्लोषापर्यंत, हा तो क्षण आहे ज्याने सर्वकाही बदलले! अनिलकुमार बोल्लाने 100 दशलक्ष दिर्हाम जिंकले. 18 ऑक्टोबर हा दिवस अनिलकुमारसाठी फक्त एक सामान्य दिवस नव्हता, तर त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलणारा दिवस होता,” असे त्या पोस्टमध्ये नमूद आहे.
व्हिडिओमध्ये अनिलकुमार हा जॅकपॉट जिंकल्याचा आनंद साजरा करताना दिसतो. त्याच्यावर सोन्याची कॉन्फेटी उधळण्यात आली आणि त्याला प्रातिनिधिक धनादेश देण्यात आला.
From anticipation to celebration, this is the reveal that changed everything!
— The UAE Lottery (@theuaelottery) October 27, 2025
Anilkumar Bolla takes home AED 100 Million! A Lucky Day we’ll never forget. 🏆
For Anilkumar, Oct. 18 wasn’t just another day, it was the day that changed everything.
A life transformed, and a reminder… pic.twitter.com/uzCtR38eNE
लकी नंबरची कहाणी:
अनिलकुमारने त्याचे तिकीट निवडण्यामागचे गुपित सांगितले आणि ही बातमी समजल्यावर आलेली त्याची प्रतिक्रियाही व्यक्त केली. “मी काही जादू वगैरे केली नाही, मी फक्त इझी पिक निवडले… पण शेवटचा क्रमांक खूप खास आहे. तो माझ्या आईचा वाढदिवस आहे,” असे त्याने सांगितले.
जिंकल्याचे कळल्यावर काय वाटले, हे सांगताना तो म्हणाला, “मला धक्काच बसला होता. मी सोफ्यावर बसून ‘होय, मी जिंकलो’ अशी भावना अनुभवत होतो.”
पैशांचा योग्य वापर आणि भविष्याची योजना:
या भारतीय अनिवासी व्यक्तीने सांगितले की, तो हे पैसे अत्यंत जबाबदारीने वापरणार आहे. “मी या रकमेची योग्यरित्या गुंतवणूक कशी करायची, याचा विचार करत होतो. ही रक्कम जिंकल्यानंतर मला जाणवले की आता माझ्याकडे पैसा आहे. आता मला माझ्या विचारांवर योग्य मार्गाने काम करायचे आहे आणि मला काहीतरी मोठे काम करायचे आहे,” अशी त्याची योजना आहे.
त्याला एक सुपरकार खरेदी करायला आणि लक्झरी रिसॉर्टमध्ये सेलिब्रेशन करायला आवडेल, असेही त्याने सांगितले. पण, त्याची सर्वात मनापासूनची इच्छा आहे ती म्हणजे आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवणे.
“मला माझ्या कुटुंबाला UAE मध्ये घेऊन जायचे आहे आणि त्यांच्यासोबत आयुष्यभर आनंदात राहायचे आहे,” अशी भावनिक इच्छा त्याने व्यक्त केली.
यापूर्वी सप्टेंबरमध्ये, दुबईमध्ये राहणाऱ्या संदीप कुमार प्रसाद नावाच्या दुसऱ्या एका भारतीयाने अबू धाबी बिग टिकेट सिरीज 278 ड्रॉमध्ये 15 दशलक्ष दिर्हामचे (सुमारे 35 कोटी रुपये) ग्रँड बक्षीस जिंकले होते.
हे देखील वाचा – ‘The Family Man 3’ ची रिलीज तारीख निश्चित! 4 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी श्रीकांत तिवारीचा कमबॅक









