Ladki Bahin Yojana eKYC: महायुती सरकारने राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. या योजनेतून पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात दिली जाते.
योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि गरजू महिलांनाच नियमितपणे लाभ मिळावा या उद्देशाने राज्य सरकारने ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ज्या लाभार्थी महिलांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांच्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अंतिम मुदत जाहीर केली आहे.
ई-केवायसीची अंतिम मुदत आणि सूचना:
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर समाज माध्यमावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी सर्व उर्वरित लाभार्थी भगिनींना 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. ई-केवायसी न केल्यास पुढील हप्ते थांबण्याची किंवा योजनेतील नाव वगळण्याची शक्यता आहे.
ई-केवायसीची ही सुविधा 18 सप्टेंबर 2025 पासून योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे: https://ladakibahin.maharashtra.gov.in
या प्रक्रियेत ओटीपी संबंधी तांत्रिक अडचणी येत असल्याचे समोर आले होते, मात्र या अडचणी दूर करण्यात येतील, असे आश्वासन आदिती तटकरे यांनी दिले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली.
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) October 28, 2025
दिनांक १८ सप्टेंबर २०२५ पासून https://t.co/gBViSYZxcm या…
ई-केवायसी करण्याची सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत:
योजनेतील लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालील टप्पे आहेत:
प्रक्रिया पूर्ण: शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
संकेतस्थळाला भेट: योजनेच्या अधिकृत संकेतस्थळ https://ladakibahin.maharashtra.gov.in ला भेट द्या.
ई-केवायसी फॉर्म: मुखपृष्ठावरील ‘e-KYC’ बॅनरवर क्लिक करून फॉर्म उघडा.
आधार पडताळणी: लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक नमूद करून, संमती देत ‘Send OTP’ वर क्लिक करावे. आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी टाकून ‘Submit’ बटणावर क्लिक करा.
पात्रता तपासणी: तुमची ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे की नाही, तसेच आधार क्रमांक पात्र यादीत आहे की नाही, हे प्रणाली तपासेल.
पती/वडिलांचा आधार: पात्र ठरल्यास, पुढील टप्प्यात पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक, पडताळणी संकेतांक आणि ओटीपी प्रक्रियेद्वारे माहिती सबमिट करा.
घोषणापत्र: लाभार्थ्याने जात प्रवर्ग निवडून, कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत किंवा सेवानिवृत्त होऊन निवृत्तीवेतन घेत नाही आणि कुटुंबातील केवळ 1 विवाहित व 1 अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे, या बाबी प्रमाणित कराव्या लागतील.
हे देखील वाचा – Paytm, PhonePe आणि Google Pay वर UPI AutoPay कसे बंद करावे? स्टेप-बाय-स्टेप संपूर्ण प्रक्रिया









