Home / लेख / Cheapest Diesel Cars: भारतातील सर्वात स्वस्त 5 डिझेल कार, मायलेज 24 kmpl पर्यंत; किंमत देखील कमी

Cheapest Diesel Cars: भारतातील सर्वात स्वस्त 5 डिझेल कार, मायलेज 24 kmpl पर्यंत; किंमत देखील कमी

Cheapest Diesel Cars: वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे आजही अनेक ग्राहक उत्तम मायलेज देणाऱ्या डिझेल कारला अधिक प्राधान्य देतात. अलीकडेच केंद्र सरकारने...

By: Team Navakal
Cheapest Diesel Cars: भारतातील सर्वात स्वस्त 5 डिझेल कार, मायलेज 24 kmpl पर्यंत; किंमत देखील कमी

Cheapest Diesel Cars: वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे आजही अनेक ग्राहक उत्तम मायलेज देणाऱ्या डिझेल कारला अधिक प्राधान्य देतात. अलीकडेच केंद्र सरकारने केलेल्या जीएसटी कपातीमुळे डिझेल कारची खरेदी आणखी किफायतशीर झाली आहे.

जर तुमचे बजेट मर्यादित असेल आणि तुम्हाला पॉवर, मायलेज व सुरक्षितता या तिन्ही गोष्टी एकाच वेळी हव्या असतील, तर बाजारातील टॉप 5सर्वात स्वस्त आणि दमदार डिझेल कारचे नवे दर आणि वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

1. Tata Nexon Diesel (टाटा नेक्सॉन डिझेल) टाटा नेक्सॉन ही देशातील सर्वात सुरक्षित कॉम्पॅक्ट एसयूव्ही (SUV) म्हणून ओळखली जाते आणि जीएसटी कपातीमुळे तिचा डिझेल व्हेरियंट आता अधिक स्वस्त झाला आहे.

  • इंजिन: 1.5-लीटर डिझेल इंजिन.
  • मायलेज: 24.08 kmpl.
  • किंमत: जीएसटी कपातीनंतर नेक्सॉन डिझेलची किंमत आता 9.01 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

2. Kia Sonet Diesel (किया सॉनेट डिझेल) कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये किया सॉनेट डिझेल व्हेरियंट त्याच्या मायलेज आणि फीचर्समुळे खूप लोकप्रिय आहे.

  • इंजिन आणि गिअरबॉक्स: 1.5-लीटर CRDi इंजिनसह 6-स्पीड iMT आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध.
  • मायलेज: सुमारे 24.1 kmpl.
  • किंमत: सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत आता 8.98 लाख रुपये आहे.

3. Mahindra Bolero Neo (महिंद्रा बोलेरो निओ) जर तुम्हाला स्टँडर्ड बोलेरोपेक्षा अधिक ॲडव्हान्स फीचर्स आणि स्टायलिश लूक असलेली एसयूव्ही हवी असेल, तर बोलेरो निओ एक चांगला पर्याय आहे.

  • फीचर्स: 16-इंच अलॉय व्हील, रियर-व्ह्यू कॅमेरा, क्रूझ कंट्रोल, आणि 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम.
  • इंजिन: mHAWK100 इंजिन.
  • पॉवर: 98.6 bhp आणि 260 Nm टॉर्क जनरेट करते.
  • किंमत: एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख रुपयांपासून सुरू होते.

4. Tata Altroz Diesel (टाटा अल्ट्रोज डिझेल) टाटा अल्ट्रोज ही भारतातील सर्वात स्वस्त डिझेल प्रीमियम हॅचबॅकपैकी एक आहे, जी चांगल्या मायलेजसाठी ओळखली जाते.

  • इंजिन: 1.5-लीटर टर्बो डिझेल इंजिन.
  • पॉवर: 90 PS पॉवर आणि 200 Nm टॉर्क जनरेट करते.
  • मायलेज: सुमारे 23.64 kmpl.
  • किंमत: जीएसटी कपातीनंतर किंमत आता 8.10 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

5. Mahindra Bolero (महिंद्रा बोलेरो) ग्रामीण भागासाठी आणि खडबडीत रस्त्यांसाठी रफ अँड टफ एसयूव्ही प्रकारात महिंद्रा बोलेरो हा एक विश्वासार्ह आणि स्वस्त पर्याय आहे.

  • किंमत: एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते.
  • इंजिन: 1.5-लीटर mHawk75 डिझेल इंजिन.
  • पॉवर: 75 PS पॉवर आणि 210 Nm टॉर्क देते.
  • मायलेज: सुमारे 16 kmpl.

हे देखील वाचा – Paytm, PhonePe आणि Google Pay वर UPI AutoPay कसे बंद करावे? स्टेप-बाय-स्टेप संपूर्ण प्रक्रिया

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या