Home / महाराष्ट्र / Sugarcane Price Dispute : हंगामापूर्वीच साखरपट्ट्यातील शेतकरी संघटना आक्रमक? ऊस दरावरून वाद पुन्हा एकदा पेटला..

Sugarcane Price Dispute : हंगामापूर्वीच साखरपट्ट्यातील शेतकरी संघटना आक्रमक? ऊस दरावरून वाद पुन्हा एकदा पेटला..

Sugarcane Price Dispute : महाराष्ट्रात अनेक भागात शेतकऱ्यांची व्यथा काही अधिक प्रमाणावर सारखीच आहे. अशातच शेकऱ्यांची आक्रमक भूमिका कधीही रास्तच...

By: Team Navakal
Sugarcane Price Dispute

Sugarcane Price Dispute : महाराष्ट्रात अनेक भागात शेतकऱ्यांची व्यथा काही अधिक प्रमाणावर सारखीच आहे. अशातच शेकऱ्यांची आक्रमक भूमिका कधीही रास्तच मानली जाते. ऊस दराच्या मुद्द्यावरून हंगाम सुरू होण्यापूर्वीच साखरपट्ट्यांमध्ये शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे. साखर सम्राटांचे कारखाने हे लक्ष्य करून ऊसतोड थांबवली जात आहे.

ऊस दराचा मुद्दा शेतकरी संघटनांकडून तापवला जात असताना दुसरीकडे त्यांच्यामध्ये अंतर्गत स्पर्धेचाही लवलेश दिसत आहे. याचवेळी साखर उद्योजकांना देखील हंगाम सुरू कधी करायचा याचा पेच पडला असल्याने हंगामाचे गुंतागुंत वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे.

यावर्षीचा हंगाम हा लवकरात लवकर सुरू व्हावा असा राज्यातील साखर कारखानदारांचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक देखील पार पडली या बैठकीत त्यांनी तशी मागणी देखील केली होती. बहुतेक साखर कारखान्यांच्या कार्यस्थळावर ऊस तोडणी यंत्रणा दाखलसुद्धा झाली आहे. दिवाळी संपल्यानंतर हे हंगाम सुरू करण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत. काही कारखान्यांनी मात्र ऊसतोडीला सुरवात केली होती. मात्र ती सुरू होताच ऊस दरावरून शेतकरी संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उगारले असल्याचे दिसून येत आहे.

शिरोळचे आमदार, माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घोडावत खांडसरी या जागी या गुळ पावडर निर्मिती करणाऱ्या कारखान्यात जाऊन आंदोलन करण्यात आले. अंकुश या संघटनेने मागील हंगामातील प्रति टन २०० रुपये आणि या हंगामासाठी ४ हजार रुपये दर दिल्याशिवाय हंगाम सुरू करू देणार नसल्याचे सांगत ऊस तोड रोखली आहे. यातून पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली असून पोलिसांनी आंदोलकांना अटक केली आहे. या कारवाईमुळे घाबरून न जात कालसुद्धा जागोजागी ऊसतोड रोखण्याचे आदेश संघटनेचे प्रमुख अध्यक्ष धनाजी चडमुंगे यांनी दिले होते.

माजी खासदार राजू शेट्टीच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने समरजित घाटगे यांच्या कागल तालुक्यातील शाहू साखर कारखान्याची ऊसतोड त्यांच्याच कार्यक्षेत्रात जाऊन रोखली.

ऊस तोड करणारी वाहने देखील परत पाठवून दिली जात आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करण्याचाही शेतकरी संघटनेचा हा एक भाग असल्याचे आता बोलले जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद होऊन त्यामध्ये यावर्षीच्या ऊस गळित हंगामासाठी प्रति टन ३७५१ रुपये इतका दर देण्यात याव नाहीतर साखर कारखानदारांच्या विरोधात आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

हंगाम सुरू झाल्यानंतर कारखानदारांनी मागणीप्रमाणे उसाची देयके न दिल्यास आंदोलन करण्याचा थेट इशारा शेट्टी यांनी परिषदेत या आधी दिला होता. मात्र हंगामाला सुरुवात होण्याआधीच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आधीच्या निर्णयाला मुरड घालत ऊसतोड रोखायला सुरुवात केली आहे.

याव्यतिरिक्त मराठवाडा, अहिल्यानगर या जिल्ह्यादेखील या जिल्ह्यातीलच स्वाभिमानीच्या स्थानिक नेतृत्वाने एफआरपी प्रमाणे उसाची देयके न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. आंदोलक अंकुश या संघटने ऊसतोड रोखण्याचे पहिले आंदोलन हाती घेऊन हि आघाडी घेतली आहे. त्यामुळे स्वाभिमानीला हंगामानंतर आंदोलन करण्याची भूमिका ब्रेक देऊन ऊस तोड रोखणे भाग पडले आहे. त्यामुळे शेतकरी संघटना अंतर्गतही ऊस दराच्या आंदोलकांची आपापसात स्पर्धा दिसू लागली आहे.

मागील हंगामाचा हिशोब शिवाय या वर्षीचा ऊस दर जाहीर केल्याशिवाय अर्थात कारखान्याने हंगाम सुरू करण्यापूर्वी तो जाहीर करावा अन्यथा ६ नोव्हेंबर पासून साखर सहसंचालक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे आणि या संदर्भातील अधिक माहिती जय शिवराय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी दिली. विविध शेतकरी संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा हंगामाचा गुंता शासन, साखर कारखानदार कशा पद्धतीने सोडवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


हे देखील वाचा – Ladki Bahin Yojana eKYC: लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयांचा हप्ता थांबणार; ‘या’ तारखेपर्यंत पूर्ण करा केवायसी प्रक्रिया

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या