Home / महाराष्ट्र / Vasai virar News : वसईतील तरणतलावात साडेतीन वर्षांय मुलाचा बुडून मृत्यू..

Vasai virar News : वसईतील तरणतलावात साडेतीन वर्षांय मुलाचा बुडून मृत्यू..

Vasai virar News : वसई विरार हे तेथे असणारे समुद्र तलाव यामुळे देखील ओळखला जातो. पण आत वसई विरार शहरातील...

By: Team Navakal
Vasai virar News

Vasai virar News : वसई विरार हे तेथे असणारे समुद्र तलाव यामुळे देखील ओळखला जातो. पण आत वसई विरार शहरातील तरणतलाव धोकादायक ठरू लागला आहे. काल संध्याकाळच्या सुमारास विरार (पश्चिम) येथील यशवंत नगर भागातील अमय क्लब स्विमिंग पूल मध्ये साडेतीन वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ध्रुव बिष्ट असे मृत्यू झालेल्या या लहानग्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विरार मध्ये राहणारा ध्रुव बिष्ट हा मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या आईसोबत अमय क्लबच्या स्विमिंग पूलमध्ये गेला होता. पोहत असताना त्याच्या नका तोंडात पाणी गेले आणि तो गुदमरू लागला.

पूलवरील गार्डने त्याला तत्काळ बाहेर काढले, पण त्याला उलट्या सुरु झाल्या. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तोपर्यंत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच बोळिंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मुलाचे मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी बोळिंज पोलिसांनी अपघाती मृत्यू (ADR) म्हणून नोंद घेतली आहे शिवाय या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. घटनेनंतर स्विमिंग पूलमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.


हे देखील वाचा –

Artificial Rain : दिल्लीत कृत्रिम पावसावरून राजकारण तापले..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या