Home / देश-विदेश / Droupadi Murmu: राफेल लढाऊ विमानातून राष्ट्रपती मुर्मू यांची भरारी

Droupadi Murmu: राफेल लढाऊ विमानातून राष्ट्रपती मुर्मू यांची भरारी

Droupadi Murmu- राष्ट्रपती आणि भारतीय सशस्त्र दलाच्या प्रमुख द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu)यांनी आज अंबालातील नौदलाच्या हवाई तळावरून सकाळी साडे अकरा...

By: Team Navakal
Droupadi Murmu

Droupadi Murmu- राष्ट्रपती आणि भारतीय सशस्त्र दलाच्या प्रमुख द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu)यांनी आज अंबालातील नौदलाच्या हवाई तळावरून सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास राफेल लढाऊ विमानातून उड्डाण केले. हेल्मेट आणि सनग्लासेस घालून त्यांनी राफेलमधून उपस्थितांना हात उंचावून अभिवादन केले.


आज सकाळी हवाई दल तळावर पोहोचल्यानंतर त्यांना नौदलाकडून समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी राफेल लढाऊ विमानातून उड्डाण केले. त्या या विमानातून उड्डाण करणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. एप्रिल 2023 मध्ये त्यांनी आसाममधील तेजपूर हवाई दलाच्या तळावर सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमानातून उड्डाण केले होते. या उड्डाणानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी एक्सवरून राफेल उड्डाण हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव असल्याचे लिहित भारतीय हवाई दलाचे आणि अंबाला हवाई दल स्थानकाच्या पथकाचे अभिनंदन केले.


राष्ट्रपती मुर्मू या लष्करी विमानातून उड्डाण करणाऱ्या तिसऱ्या राष्ट्रपती आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. यापूर्वी माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी 8 जून 2006 आणि माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी 25 नोव्हेंबर 2009 रोजी पुण्याजवळील लोहगाव येथील हवाई दल तळावरून सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमानातून उड्डाण केले होते.

—————————————————————————————————————————————————–

हे देखील वाचा

दिल्लीत कृत्रिम पावसावरून राजकारण तापले..

ज्वेलरी शॉपचा रखवालदार! कुत्र्याच्या अंगावर ५० तोळे सोने

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या