Jain Bording Land Deal Case -मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीचा विक्री व्यवहार (Jain Bording Land Deal Case) तत्काळ रद्द करून न्याय मिळावा, या मागणीसाठी आज जैन समाजाने एकदिवसीय उपवास केला. जमीन आणि मंदिर पुन्हा जैन समाजाच्या ताब्यात येईपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार जैनमुनी गुप्तनंद महाराज यांनी व्यक्त केला.
गुप्तनंद महाराज म्हणाले की, गोखले बिल्डर आणि ट्रस्टी यांनी माघार घेण्याची तयारी दर्शवली असली तरी कायदेशीरदृष्ट्या हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. उद्या धर्मादाय आयुक्तांकडे या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. जर या सुनावणीत आमच्या बाजूने निकाल लागला तर ठिक आहे नाहीतर 31 तारखेपासून आमचे अनेक अनुयायी उपोषणाला बसतील आणि 1 नोव्हेेंबरपासून मी स्वत: उपोषणाला बसेल. जोपर्यंत जमीन विक्री व्यवहार रद्द झाल्याचा अधिकृत कागद जैन समाजाच्या हाती येत नाही तोपर्यंत साधना, आंदोलन आणि लढा
सुरूच राहील.
आज संपूर्ण जगात भगवानसाठी उपवास केला जात आहे. इथे दिसायला जरी 50-60 लोक असले तरी जगभरातील हजारो लोक आज उपवास करत आहेत. सर्वांचा एकच भाव आहे. या उपवासाच्या शक्तीमुळे आमचे पुण्य वाढावे आणि धर्मादाय आयुक्तांना योग्य निर्णय घेण्याची बुद्धी प्राप्त व्हावी. गुप्तनंद महाराजांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने जैन बोर्डिंगमध्ये येऊन प्रायश्चित्त करावे, अशी मागणीही केली.
आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर होते. जैन बोर्डिंगला ते भेट देणार का, असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, ते येथे येण्याची शक्यता आहे, मात्र खात्री देता येत नाही. अनेक कामांमुळे त्यांची व्यस्तता असते. पण जर त्यांचे पुण्य असेल आणि भगवान महावीरांच्या दर्शनाचा योग आला, तर ते नक्की येतील. पुण्य नसेल तर येऊ
शकणार नाहीत.ते पुढे म्हणाले की, ट्रस्टींनी बिल्डर विशाल गोखले यांच्याकडून घेतलेली रक्कम परत करावी. आम्हाला कुणाच्याही अन्यायातून किंवा दु:खातून मिळालेले पैसे नकोत.
—————————————————————————————————————————————————–
हे देखील वाचा –









