Home / मनोरंजन / Abhishek Bachchan : अभिषेक बच्चनच ट्रोलर्सना सडेतोड उतार..

Abhishek Bachchan : अभिषेक बच्चनच ट्रोलर्सना सडेतोड उतार..

Abhishek Bachchan : बॉलिवूडमध्ये अश्या काही गोष्टी आहेत ज्याचा अंदाज सर्वसामान्य कधीच लावू शकत नाही असं वारंवार बोललं जात. त्यातही...

By: Team Navakal
Abhishek Bachchan

Abhishek Bachchan : बॉलिवूडमध्ये अश्या काही गोष्टी आहेत ज्याचा अंदाज सर्वसामान्य कधीच लावू शकत नाही असं वारंवार बोललं जात. त्यातही फिल्म फेअर सारखे अवॉर्ड शो सुद्धा तितकीच रंगत आणतात. मनोरंजन विश्वातले अनेक पुरस्कार हे कायमच चर्चेचा विषय असतात तर हे पुरस्कार पैसे देऊन घेतले जात असल्याच्या चर्चा देखील बऱ्याचदा रंगतात. याबद्दल काही कलाकार देखील मोकळेपणानं आपलं मत मांडतात. बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्यांवर पैसे देऊन पुरस्कार घेतल्याच्या अनेक टीका झाल्या आहेत. अशातच अभिनेता अभिषेक बच्चनवरही ही टीका सातत्याने होत आहे.

नुकत्याच झालेल्या ७०व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अभिषेक बच्चनला देखील पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार त्याला ‘I Want To Talk’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारताना अभिषेक अत्यंत भावूक झालेला दिसून आला. २५ वर्षांनी त्याला हा फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला असल्याची माहिती आहे. मात्र, या पुरस्काराबद्दल त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. अभिनेत्याने हा पुरस्कार पैसे देऊन घेतला असल्याची टीका त्याच्यावर होत आहे.

या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “तुम्ही तुमच्या आज पर्यंतच्या कारकीर्तीत एकही ब्लॉकबस्टर किंवा हिट सिनेमा दिला नाही,तरी पुरस्कार खरेदी करून आणि पीआर (PR) करून तुम्ही प्रसिद्ध होऊ शकता, याचं जिवंत उदाहरण म्हणजे अभिषेक बच्चन. सांगताना वाईट वाटतं की, अभिषेक हा एक आदर्श उदाहरण आहे की, तुम्ही कस पुरस्कार खरेदी करून आणि पीआर (PR) करून प्रसिद्ध होऊ शकता.”

पुढे तो असं हि म्हणतो कि त्याने यंदा I Want To Talk साठी फिल्मफेअर पुरस्कार जिंकला. पण, हा चित्रपट काही मोजक्या पैसे दिलेल्या लोकांनव्यतिरिक्त कोणीही पाहिला नाही आणि आता मी हे सर्व वेगळंच पाहतोय, जिथे २०२५ हे त्याचं वर्ष आहे असं सांगितलं जात आहे, खर तर हे खूप मजेशीर आहे. त्याच्यापेक्षा खूप चांगले अभिनेते आजही आहेत, ज्यांना अधिक ओळख, प्रशंसा आणि पुरस्कारास ते अधिक पात्र आहेत.पण दुर्दैवाने त्यांच्याकडे योग्य पीआर (PR) आणि पैसे नाहीत.”

या टीकेवर अभिषेकने देखील आपले मौन सोडले आहे. त्यावर संयमाने उत्तर देताना तो म्हणाला “माझ्याकडून कधीही कोणताही पुरस्कार खरेदी केला गेला नाही. अथवा मी काही PR केलेला नाही. हा पुरस्कार फक्त माझ्या कठोर परिश्रम, कष्ट आणि घाम गाळून मिळालेला आहे.” यापुढे अभिषेक म्हणतो, “माझं हे सांगण तुम्ही मान्य कराल का? की नाही अशी मला शंका आहे, त्यामुळे तुम्हाला योग्य ते उत्तर देण्याचा माझा उत्तम मार्ग म्हणजे मी आणखी मेहनत करेन, जेणेकरून माझ्या भविष्यातील कोणत्याही यशावर तुम्हाला शंका उपस्थित करू शकणार नाही. मी तुम्ही चुकीचे आहात हे सिद्ध करीनच”

हा पुरस्कार घेताना अभिषेक भावुक झाल्याचे दिसून आले. २५ वर्षांच्या अपार मेहनतीनं यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार मी मिळवला. यावेळी अभिषेक भावूक होत म्हणाला की, हा पुरस्कार म्हणजे २५ वर्षांच्या अपार मेहनतीचं फळ आहे. तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी भरपूर मेहनत घ्या. या पुरस्कारामागे “ऐश्वर्या आणि आराध्या यांनी देखील खूप मोठा त्याग केला आहे. हा पुरस्कार मी खास व्यक्तींना अर्पण करतो आणि त्या व्यक्ती म्हणजे माझे वडील आणि माझी मुलगी आराध्या.”


हे देखील वाचा –

Suicide Case : राहात तालुक्यात तरुणाची आत्महत्या..तरुणाला मारहाण शिवीगाळ आणि बरच काही..

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या