Sudhir Dalvi : साईं बाबा’ (Shirdi Ke Sai Baba) फेम दिग्गज अभिनेते सुधीर दळवी (Sudhir Dalvi) यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती आहे. शिवाय त्यांच्यावर मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुधीर दळवी हे सध्या इन्फेक्शनच्या समस्येनं प्रचंड त्रस्त आहेत. त्यांना सेप्सिससारखं जीवघेणं इन्फेक्शन (Sepsis Infection) झाल्याची माहिती आहे. सध्या ते जीवन आणि मृत्यूच्या दारात उभे आहेत. अशातच आता सर्वात दुःखद बाब म्हणजे, त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या उपचाराना लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी आवाहन करावं लागत आहे. १९७७ मध्ये आलेल्या ‘शिरडी के साईं बाबा’ या मालिकेत सुधीर दळवी यांनी साई बाबांची भूमिका साकारलेली. आणि ती सिरियल प्रसिद्धी जातात आली. त्या काळात त्यांना देखील खूप मोठी प्रसिद्धी मिळालेली. अनेकजण त्यांनाच खरे साईबाबा समजू लागलेले. सध्या ते ८६ वर्षांचे आहेत.
मिळालेल्या काही अहवालानुसार सुधीर दळवी यांच्या उपचारासाठी सध्या १० लाख रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. त्यांचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडलंय. त्यांच्या उपचारासाठी अजून १५ लाख रुपयांची गरज असल्याची माहिती आहे. त्यासाठी कुटुंबीयांनी आता फिल्म इंडस्ट्रीसोबतच सुधीर दळवींच्या चाहत्यांकडे मदतीचं आवाहन केल आहे.
सुधीर दळवी यांनी अनेक मालिका आणि सिनेमातून लोकांचं मनोरंजन केलं आहे. कित्येक दशकांपूर्वी त्यांनी एका फिल्ममध्ये शिर्डीच्या साईबाबांची भूमिका साकारली होती. त्यासाठी त्यांना आजही ओळखलं जातं. सुधीर दळवी यांनी रामानंद सागर यांची सीरिअल ‘रामायण’ मध्येसुद्धा काम केलेलं. त्यांनी त्यात ऋषि वशिष्ठच्या रोल साकारला होता. सुधीर दळवी २००३ मध्येही पडद्यावर दिसलेले.
बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते ऋषि कपूर यांची लेक तसेच रणबीर कपूरची यांची बहीण रिद्धिमा कपूर साहनी हिनं सुधीर दळवींना मदतीचा हात पुढे केला आहे. पण, यात तिला जोरदार ट्रॉल केलं जात आहे. रिद्धिमा कपूरनं अभिनेत्यासाठी जमा करण्यात येणाऱ्या वैद्यकीय निधीत योगदान दिल्याचं जाहीर केल आहे. त्यासंदर्भात तिनं एक कमेंट देखील केली. म्हणूनच ती ट्रोल होते आहे. इन्स्टाग्रामवरील एका माध्यमाच्या पोस्टवर कमेंट करत रिद्धिमानं आर्थिक मदत पाठवल्याचं म्हटलंय, शिवाय तिनं सुधीर यांना लवकरात लवकर बरं वाटावं याकरता प्रार्थनादेखील केली आहे. यामुळे ती चांगलीच ट्रोल होते आहे.
हे देखील वाचा –
Murder Case : भिवंडीत विकृतपणाचा कळस! वृद्ध महिलेची दगडाने ठेचून हत्या.









