Attack On Wife – ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ (Ambernath)परिसरात महिला डॉक्टर किरण शिंदे (Dr. Kiran Shinde) यांच्यावर पती विश्वंभर शिंदे यानेच खलबत्त्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. समाज माध्यमावर (Social Media)एका मित्राने डॉ. किरण यांना नाइस डीपी म्हणत फोटोचे कौतुक केले.
त्यावरून शिंदे पती – पत्नीत वाद झाला. या वादातच पतीने पत्नीवर खलबत्त्याने हल्ला केला. या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाल्या, मुलामुळे त्यांचा जीव वाचला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.
डॉ. किरण शिंदे या अंबरनाथमधील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट (Radiologist)आहेत. त्या अंबरनाथ पश्चिम येथे गृहसंकुलात पती आणि दोन मुलांसह राहतात. मागील काही दिवसांपासून त्यांचे पती विश्वंभर (Vishwambhar)सोबत कौटुंबिक वाद सुरू होते. काल सकाळी डॉ. किरण पती विश्वंभरसाठी चहा करण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या.
यावेळी त्यांच्यात मित्राने समाजमाध्यमावर कौतुक केल्याच्या कारणातून वाद झाला. याच वादातून विश्वंभर यांनी स्वयंपाकघरात येऊन किरण यांचा गळा पकडला आणि त्यांच्या डोक्यात खलबत्त्याने मारहाण सुरू केली.यावेळी किरण यांचा आरडाओरडा ऐकून त्यांची मुले स्वयंपाकघरात धावत आली आणि त्यांनी आईची सुटका केली.या हल्ल्यात जखमी झालेल्या किरण यांना तात्काळ बदलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
हे देखील वाचा –
भिवंडीत विकृतपणाचा कळस! वृद्ध महिलेची दगडाने ठेचून हत्या.
सुदानमध्ये युद्ध चिघळले ; ४८ तासांत २००० हुन अधिक नागरिकांची हत्या..
रोहित पवारांवर डोनाल्ड ट्रम्पच्या बनावट आधारकार्ड प्रकरणी गुन्हा









