Home / महाराष्ट्र / Rohit Arya: 17 मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्या कोण होता? वाचा

Rohit Arya: 17 मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्या कोण होता? वाचा

Who was Rohit Arya: देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील पवई परिसरात एका अत्यंत खळबळजनक घटनेत 17 लहान मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित...

By: Team Navakal
Who was Rohit Arya

Who was Rohit Arya: देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील पवई परिसरात एका अत्यंत खळबळजनक घटनेत 17 लहान मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या नावाच्या व्यक्तीचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे.

पवई येथील आरए स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी आलेल्या 15 वर्षांखालील मुला-मुलींना रोहित आर्याने एका खोलीत डांबून ठेवले होते.

रोहित आर्या कोण होता?

रोहित आर्या (मूळ नाव रोहीत हरोलीकर) हा त्याच्या सामाजिक कार्यात सक्रिय होता. तो मूळचा पुण्यातील रहिवासी असून नागपूरमधील एका महाविद्यालयात प्राध्यापक होता. सध्या तो चेंबूरमध्ये राहत होता.

  • सामाजिक आणि शैक्षणिक कार्य: रोहित ‘प्रोजेक्ट लेट्स चेंज’ या संस्थेचा संस्थापक आणि संचालक होता. ही एनजीओ शाळांमध्ये स्वच्छता जनजागृती आणि मुलांना ‘स्वच्छता दूत’ बनवण्यावर काम करत होती. त्याने ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या प्रकल्पासाठी ‘स्वच्छता मॉनिटर’ ही संकल्पना मांडल्याचा दावा केला होता. 2013 मध्ये त्याने गुजरातमध्येही हा उपक्रम सुरू केला होता आणि तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी त्याचे कौतुकही केले होते, असे तो सांगत असे.
  • सरकारी प्रकल्पात आर्थिक नुकसान: रोहितने या स्वच्छता मॉनिटर प्रकल्पावर आणि अन्य सरकारी योजनांमध्ये 60 ते 70 लाख रुपये स्वतःच्या खिशातून खर्च केले होते. मात्र, शिक्षण विभागाने त्याला प्रकल्पाचे देयक (जवळपास 2 कोटी रुपयांची तरतूद असूनही) थकवल्याचा त्याचा दावा होता.
  • मागील संघर्ष: या आर्थिक नुकसानीमुळे त्याने 2024 मध्ये तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात उपोषण आणि आंदोलनही केले होते. या दरम्यान त्याला 1 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन मिळाले होते, तसेच केसरकर यांनी वैयक्तिक पातळीवर 15 लाख रुपये दिले होते, असे त्याने पत्रकार परिषदेत सांगितले होते.

टोकाचे पाऊल उचलण्याची घटना:

या आर्थिक फसवणुकीमुळे आणि थकबाकीमुळे त्रस्त झालेल्या रोहितने संबंधित विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलले होते. त्याने व्हिडिओ शेअर करून धमकावले होते, “मी आत्महत्या करण्याऐवजी या मुलांना बंदी बनवलं आहे. मला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यास मी इमारतीला आग लावेन.”

घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने पोहोचले. पोलिसांनी शिताफीने कारवाई करत मुलांना सुरक्षित बाहेर काढले. या चकमकीत रोहित आर्या ठार झाला. त्याच्याजवळ एअरगन देखील सापडली होती.

हे देखील वाचा – Dr Sampada Munde Case : डॉ. मुंडे प्रकरणी मविआ आक्रमक; चाकणकरांचे अध्यक्षपद धोक्यात ?

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या