Asia Cup New Format : आशिया चषक 2025 स्पर्धा जिंकल्यानंतरही भारतीय क्रिकेट संघाला अद्याप विजेतेपदाची ट्रॉफी मिळालेली नाही, यावरून वाद सुरू असतानाच आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसिन नक्वी यांनी आशिया चषकाचे 2 नवे प्रकार सुरू करण्याची घोषणा केली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख असलेले मोहसिन नक्वी, यांच्यावर भारत जिंकलेली ट्रॉफी घेऊन गेल्याचा आरोप आहे. भारतीय संघाने त्यांच्याकडून ती ट्रॉफी स्वीकारली नव्हती.
मोहसिन नक्वी यांच्या या 2 नव्या स्पर्धांच्या योजनांवर भारताचे काय मत असेल, याकडे आता संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे.
आशिया चषकाच्या 2 नव्या स्पर्धा:
1. रायझिंग स्टार्स आशिया कप:
- स्वरूप: या स्पर्धेला यापूर्वी इमर्जिंग आशिया कप म्हटले जात होते. ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावरची स्पर्धा नसेल.
- सहभागी संघ: यामध्ये टेस्ट खेळणाऱ्या देशांच्या ‘ए’ टीम्स आणि असोसिएट नेशन्सचे मुख्य संघ भाग घेतील. भारतीय ‘ए’ टीम देखील या स्पर्धेत खेळणार असल्याने, चाहत्यांना पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानची लढत पाहायला मिळेल.
- आयोजन: या स्पर्धेचा पहिला सीझन 12 नोव्हेंबरपासून दोहा येथे 14 ते 23 नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे.
- टीम्स: मुख्य स्पर्धेत खेळलेल्या 8 टीम्स यात असतील. पूर्ण सदस्य देशांच्या ‘ए’ टीम्स आणि ओमान, यूएई व नेपाळचे मुख्य संघ स्पर्धेचा भाग असतील.
2. अंडर 19 आशिया कप:
- स्वरूप: ही स्पर्धा 19 वर्षांखालील क्रिकेटपटूंसाठी आयोजित केली जाईल.
- वेळापत्रक: या स्पर्धेचे आयोजन डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे, मात्र तारखा आणि ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही.
ट्रॉफीच्या हस्तांतरणासाठी बीसीसीआय दबाव आणणार?
ACC ने नव्या स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी, भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्ड (BCCI) यावर आक्षेप घेऊ शकते. आशिया चषकाची ट्रॉफी तात्काळ भारताला हस्तांतरित करण्यासाठी बीसीसीआय मोहसिन नक्वी यांच्यावर दबाव आणू शकते.
मोहसिन नक्वी यांनी भारतीय खेळाडूंनी ती ट्रॉफी त्यांच्याकडून घेऊन जावी असे म्हटले असले तरी, भारतीय बोर्ड यासाठी तयार झालेले नाही आणि ट्रॉफी अजूनही ACC च्या मुख्यालयातच आहे.
हे देखील वाचा – India vs South Africa Final: यंदा नवा वर्ल्ड चॅम्पियन! भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महिला विश्वचषक फायनल कधी आणि कुठे होणार?









