Home / लेख / Amazon Delivery Scam : ऑनलाईन मागवला 1.87 लाखांचा स्मार्टफोन; घरी काय आले बघा…

Amazon Delivery Scam : ऑनलाईन मागवला 1.87 लाखांचा स्मार्टफोन; घरी काय आले बघा…

Amazon Delivery Scam : ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण वाढले आहे. मात्र, ऑनलाइन खरेदी करताना काळजी देखील घ्यायला हवी. बंगळुरूतील एका सॉफ्टवेअर...

By: Team Navakal
Amazon Delivery Scam

Amazon Delivery Scam : ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण वाढले आहे. मात्र, ऑनलाइन खरेदी करताना काळजी देखील घ्यायला हवी. बंगळुरूतील एका सॉफ्टवेअर इंजिनियरला ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वरून खरेदी करणे महागात पडले आहे.

त्याने ऑर्डर केलेल्या 1.87 लाख रुपये किमतीच्या Samsung स्मार्टफोनऐवजी डिलिव्हरी पॅकेजमध्ये त्याला एक फरशीचा तुकडा मिळाला. ही फसवणूक त्याच्यासोबत दिवाळीच्या अगदी एक दिवस आधी झाली.

काय घडले नेमके?

प्रेमानंद नावाच्या या व्यक्तीने 14 ऑक्टोबर रोजी Amazon ॲपवरून हा स्मार्टफोन क्रेडिट कार्डद्वारे पूर्ण पैसे भरून ऑर्डर केला होता. 19 ऑक्टोबर रोजी त्याला सीलबंद पॅकेजची डिलिव्हरी मिळाली. मात्र, डिलिव्हरी मिळाल्यानंतर त्याने पॅकेज उघडतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. जेव्हा त्याने पॅकेज उघडले, तेव्हा त्यामध्ये Samsung Galaxy Z Fold 7 स्मार्टफोनऐवजी मार्बल दगडाचा तुकडा निघाला.

फसवणूक झालेल्या ग्राहकाची प्रतिक्रिया:

प्रेमानंद यांनी आपली निराशा व्यक्त करताना सांगितले, “मी 1.87 लाख रुपये किमतीचा Samsung Galaxy Z Fold 7 ऑर्डर केला होता, पण धक्कादायक म्हणजे दिवाळीच्या अगदी एक दिवस आधी मला फोनऐवजी फरशीचा तुकडा मिळाला.

या घटनेमुळे मी वर्षभर ज्या सणाची वाट पाहत होतो, त्याचा पूर्ण आनंद हिरावला गेला. मी लोकांना विनंती करतो की, ऑनलाइन खरेदी करताना, विशेषत: Amazon वर अत्यंत सावधगिरी बाळगा. हा अनुभव खूप निराशाजनक होता.”

पोलीस आणि Amazon ची कारवाई:

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रेमानंद यांनी तात्काळ राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांनी कुमारस्वामी लेआउट पोलीस ठाण्यात जाऊन औपचारिक तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला असून तपास सुरू केला आहे. दरम्यान, Amazon ने तपास सुरू असतानाच प्रेमानंद यांना त्यांची रक्कम परत केली आहे.

हे देखील वाचा – Maharashtra Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांचे कर्ज कधी माफ करणार? देवेंद्र फडणवीसांनी थेट तारीखच सांगितली

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या