MLA Dalvi Vs MP Tatkare – अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रोहा शहरात शिंदे गटाचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी (MLA Mahendra Dalvi)यांनी रोहा कोणाच्याही मालकीचा नाही. तटकरेंनी आम्हाला वारंवार फसवले. पण यावेळी हा शेवटचा हिशोब चुकता करू, असा इशारा दळवींनी दिला. आगामी निवडणुकीत दळवी–तटकरे संघर्षाचा फटका महायुतीला (Mahayuti alliance) बसण्याची चर्चा आहे.
अलिकडेच दळवींच्या नेतृत्वाखाली काही स्थानिक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात (Shinde faction)प्रवेश केला होता. या घडामोडीनंतर अजित पवार गटाने (Ajit Pawar group) रोहा शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तातडीची आढावा बैठक घेतली. यावेळी तटकरेंचे चिरंजीव तथा माजी आमदार अनिकेत तटकरे (Aniket Tatkare)यांनी खासदार तटकरेंना आव्हान देण्याचे काम काहीजण करत आहेत. पण अशी आव्हाने परतवून लावण्याची ताकद आमच्यात आहे, असा इशारा दिला होता.
या वक्तव्यावर पलटवार करताना आमदार दळवी म्हणाले की, सुनील तटकरे यांचा हा फसवणुकीचा धंदा आहे. त्यांनी अनेक निवडणुकांत आमच्या पाठीमागे उभे राहून नेहमी गियर बदलला आणि आमचा विश्वासघात केला. नगरपालिकेचे सर्व रेकॉर्ड आणि निधीचे विवेचन आमच्याकडे आहे. येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्ही प्रत्येक मुद्द्याचा हिशोब मांडणार आहोत.
हे देखील वाचा –
राज ठाकरेंचा मोठा इशारा! शिवरायांच्या किल्ल्यांवर ‘नमो पर्यटन केंद्र’ उभारल्यास फोडून टाकणार
बिहारमध्ये १ कोटी नोकऱ्या देणार ! २० वर्ष सत्तेनंतर तेच आश्वासन
 
								 
								 
								 
								 
								 
				 
															 
								 
								 
								 
								 
								 
								








